सिन्नर औद्योगिक वसाहतीवर प्रशासकीय मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:08+5:302021-08-13T04:18:08+5:30
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यातून शासनाने उद्योजकांच्या प्रतिनिधींचे तीन सदस्यीय अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ ...

सिन्नर औद्योगिक वसाहतीवर प्रशासकीय मंडळ
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यातून शासनाने उद्योजकांच्या प्रतिनिधींचे तीन सदस्यीय अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार स्व. सूर्यभान गडाख यांच्या कन्या सुधा माळोदे (गडाख) यांची प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी नारायण पाटील, तर सदस्य म्हणून संजय शिंदे यांचा प्रशासकीय मंडळात समावेश करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी आदेश पारित केले.
कोरोनामुळे सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली. पंडित लोंढे हे चेअरमनपदी असताना संस्थेच्या १२ पैकी सहा संचालकांनी राजीनामा दिल्याने बरखास्तीची नामुष्की ओढवली. त्यानंतर काही संचालकांनी मर्जीतील सरकारी अधिकारी संस्थेवर प्रशासक म्हणून बसवून संस्थेवर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी अध्यक्ष अविनाश तांबे यांनी केला. आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे उद्योजकांमधूनच प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा केला. यावेळी माजी अध्यक्ष पंडित लोंढे, अविनाश तांबे, माजी उपाध्यक्ष मीनाक्षी दळवी, शिवाजी आवारे, प्रवीण देशमुख, बाबासाहेब दळवी, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, अभिषेक गडाख, अमित गडाख, रवि मोगल, तुषार गडाख, नानासाहेब खुळे, सोपान गडाख, भाऊसाहेब खुळे, शिवा वाणी, संपत वाणी, दीपक गडाख आदी उपस्थित होते.
कोट....
आमदार कोकाटे यांच्यामुळे प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. वसाहतीच्या व उद्योजकांच्या हिताआड राजकारण येऊ देणार नाही. विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत.
- सुधा माळोदे (गडाख), अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ
चौकट
दोन तपानंतर गडाख कुटुंबीयांकडे कारभार
माजी आमदार स्व. सूर्यभान गडाख यांनी सहकारी तत्त्वावर उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीतून १९९८ साली त्यांनाच पायउतार व्हावे लागले होते. मात्र आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून आज स्व. गडाख यांची कन्या सुधा माळोदे (गडाख) यांच्याकडे प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आल्याने दोन तपानंतर गडाख कुटुंबाकडे या वसाहतीची सूत्रे आली आहेत.
फोटो : १२ सिन्नर गडाख
सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी सुधा माळोदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मीनाक्षी दळवी, पंडित लोंढे. समवेत उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे, अविनाश तांबे, कमलाकर पोटे आदी.