सटाणा, नामपूर बाजार समितीवर संचालक मंडळ

By Admin | Updated: July 20, 2016 01:11 IST2016-07-20T00:03:26+5:302016-07-20T01:11:36+5:30

सटाणा, नामपूर बाजार समितीवर संचालक मंडळ

Board of Directors on Satana, Nampur Market Committee | सटाणा, नामपूर बाजार समितीवर संचालक मंडळ

सटाणा, नामपूर बाजार समितीवर संचालक मंडळ

 सटाणा: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अखेर एक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. मुख्य प्रशासक म्हणून रमेश संभाजी देवरे यांची तर उपमुख्य प्रशासक म्हणून विशाल प्रभाकर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सटाणा बाजार समितीचे शासकीय मुख्य प्रशासक चंद्रकांत विघ्ने यांनी अशासकीय संचालक मंडळाकडे बाजार समितीचा पदभार सुपूर्द केला आहे. या संचालक मंडळात संचालक आहेत. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या याद्यांमधील मातब्बरांचा पत्ता कट झाल्याने बागलाण तालुक्यात नाराजीनाट्य सुरु झाले. काही नेत्यांनी तर संचालक मंडळाची यादी पाहून यालाच तर पक्ष निष्ठेचे फळ म्हणतात, असा उपरोधिक टोला लगावला. संचालक मंडळात साहेबराव रामचंद्र सोनवणे (सटाणा), यशवंत जगन्नाथ अहिरे (सटाणा), राजू बारकू जगताप (औंदाणे), दिलीप दावल सोनवणे (सटाणा), जिभाऊ त्रंबक मोरकर (कौतिकपाडे), राहुल केदा सोनवणे (सटाणा), अतुल हिरामण पवार (अजमीर सौंदाणे), लालचंद रामभाऊ सोनवणे (सटाणा), कारभारी ओमकार पगार (ठेंगोडा), प्रवीण भिला भामरे (लखमापूर), वसंत भिकाजी सोनवणे (सटाणा), किरण मधुकर अहिरे (ब्राह्मणगाव), शरद बाबूराव शेवाळे (सटाणा), राजेंद्र देवराव सोनवणे (वायगाव), साधना वसंत गवळी (मुंगसे), बाळू धर्मा बिरारी (कंधाणे) यांचा समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: Board of Directors on Satana, Nampur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.