माणकेश्वर वाचनालयाचे संचालक मंडळ बिनविरोध

By Admin | Updated: July 30, 2014 00:21 IST2014-07-29T23:17:04+5:302014-07-30T00:21:37+5:30

माणकेश्वर वाचनालयाचे संचालक मंडळ बिनविरोध

The Board of Directors of the Manekeshwar Library | माणकेश्वर वाचनालयाचे संचालक मंडळ बिनविरोध

माणकेश्वर वाचनालयाचे संचालक मंडळ बिनविरोध

निफाड : येथील शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या श्री माणकेश्वर वाचनालयाच्या संचालक मंडळाची सन २०१४-२०१९ सालासाठी पंचवार्षिक निवड बिनविरोध पार पडली. वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
सभेच्या इतिवृत्ताचे चिटणीस दत्ता उगावकर यांनी वाचन केल्यानंतर पंचवार्षिक निवड प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी आपली भूमिका विशद केली व निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानुसार सभासदांनी मधुकर शेलार, दत्ता उगावकर, चंद्रकांत पानसरे यांना इच्छुकांच्या आलेल्या नावांमधून २०१४ ते २०१९ साठी संचालक मंडळ ठरविण्यासाठी सर्वाधिकार दिले.
या समितीने मधुकर शेलार, दत्ता उगावकर, चंद्रकांत पानसरे, सीताराम गायकवाड, राजेंद्र सोमवंशी, राजेंद्र खालकर, बाळासाहेब खालकर, अ‍ॅड. प्रवीण ठाकरे, सुनील कुमावत, तनवीर राजे, सुनील निकाळे, स्त्री राखीवमध्ये सुजाता तनपुरे, डॉ. मेघा जंगम, स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. उत्तम डेर्ले, मोहन पाटील, मालती वाघावकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
या सभेमध्ये सरपंच अनिल कुंदे, उपसरपंच दिलीप कापसे, शिवाजी ढेपले, अ‍ॅड. भरत ठाकरे, प्रकाश अडसरे, प्रवीण तनपुरे, बाळासाहेब रंधवे, वसंत कापसे, मधुकर उगले, बाळासाहेब कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले.
या सभेप्रसंगी वाचनालयाकडून दिला जाणारा उत्कृष्ट वाचक पुरस्कार आजीव सभासद अ‍ॅड. प्रमोद अहेर यांना प्रदान करण्यात आला. तसेच वाचनालयाचे आजीव सभासद बबन सानप यांची व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी, दिंडोरीच्या सरपंचपदी संदीप तासकर यांची कुंदेवाडीच्या उपसरपंचपदी वैकुंठ पाटील यांची निवड झाल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रारंभी वाचनालयाच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाचनालयाचे माजी अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक कै. बा.य. परिट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राजेंद्र सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले व राजेंद्र खालकर यांनी आभार मानले.

Web Title: The Board of Directors of the Manekeshwar Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.