नाशिक : मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. शनिवार, रविवारी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यातच मुुंबईत दादर, ठाणे आदी भागांमध्ये किरकोळ विक्रीला बंदी असल्यामुळे घेतलेला माल जाईल किंवा नाही याची धास्ती असल्यामुळे अनेक भाजीपाला व्यापारी हात राखूनच माल खरेदी करीत असल्याने फळभाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली असल्याचे नाशिक येथील अडतदारांनी सांगितले. किवी २५० रु. किलोकोरोनामुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वच फळांचे दर वाढले आहेत. किवी, संत्रा या फळांना चांगली मागणी असून, किवी २०० ते २५० रुपये, तर संत्रा १३० ते १५० रुपये किलो या दराने विकला जात आहे. डाळिंब १२५ ते १५० रुपये किलोने विकले जात आहे.
बंदचा फळभाज्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:26 IST
मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.
बंदचा फळभाज्यांना फटका
ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा हात आखडता : दरामध्ये वाढ