पंचशील नगरमध्ये रिक्षाचालकाचा कुºहाडीने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:33 IST2017-08-11T02:33:00+5:302017-08-11T02:33:00+5:30

मद्यपान करीत असताना वाद होऊन झालेल्या हाणामारीत रिक्षाचालकाचा कुºहाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा पंचशील नगरमध्ये घडली.

 The blood of the rickshaw puller in Panchsheel Nagar bone | पंचशील नगरमध्ये रिक्षाचालकाचा कुºहाडीने खून

पंचशील नगरमध्ये रिक्षाचालकाचा कुºहाडीने खून

नाशिक : मद्यपान करीत असताना वाद होऊन झालेल्या हाणामारीत रिक्षाचालकाचा कुºहाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा पंचशील नगरमध्ये घडली.
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगर येथे राहणारा रिक्षाचालक विशाल प्रकाश झाल्टे (३०) आणि वॉचमनची नोकरी करणारा कैलास रामचंद्र शेजूळ (३५) हे दोघे मद्यपानासाठी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यात शेजूळ याने झाल्टे याच्यावर धारदार कुºहाडीने हल्ला केला. या हल्यात झाल्टे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती कळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित कैलास रामचंद्र शेजूळ याला अटक केली. रिक्षाचालक असलेला झाल्टे हा सातपूरचा रहिवासी होता. मात्र
गेल्या महिन्याभरापासून तो पंचशीलनगर येथे रहावयास आला होता. रात्री उशिरा पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title:  The blood of the rickshaw puller in Panchsheel Nagar bone