पंंचवटीतील ‘त्या’ वृद्धेचा खून
By Admin | Updated: February 10, 2016 00:18 IST2016-02-10T00:16:41+5:302016-02-10T00:18:23+5:30
पंंचवटीतील ‘त्या’ वृद्धेचा खून

पंंचवटीतील ‘त्या’ वृद्धेचा खून
पंचवटी : इंद्रकुंड परिसरातील वल्लभाचार्य आश्रमामध्ये आढळून आलेला मृतदेह सिंधूबाई माधवराव चव्हाण (७०) या महिलेचा असून, त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटीतील वल्लभाचार्य आश्रमातील एका खोलीत सिंधूबाई चव्हाण यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता़ श्रीकृष्ण मंदिराची देखभाल करून त्या उदरनिर्वाह करीत होत्या़ त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारील व्यक्तींनी पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून घराचे कुलूप तोडून बघितले असता चव्हाण यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता़
पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला होता़ त्यामध्ये सिंधूबाई चव्हाण यांचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी श्वान पथकामार्फत या घराची तपासणी केली असून, श्वानाने गांधीज्योतपर्यंतचा मार्ग दाखविला आहे़ या खून प्रकरणी पंचवटी पोलीस तपास करीत आहेत़ (वार्ताहर)