रक्तदान अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:28+5:302021-07-16T04:12:28+5:30

लोकमत आणि संदीप फाउंडेशनच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबिरात स्टुडंट्स वेलफेअर संचालक आरिफ मन्सुरी, रजिस्ट्रार चेतन चाैधरी, नॅकचे संचालक डॉ. ...

Blood donation campaign | रक्तदान अभियान

रक्तदान अभियान

लोकमत आणि संदीप फाउंडेशनच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबिरात स्टुडंट्स वेलफेअर संचालक आरिफ मन्सुरी, रजिस्ट्रार चेतन चाैधरी, नॅकचे संचालक डॉ. अरुण द्विवेदी, प्रवेशप्रक्रिया संचालक डॉ. डी.डी. शिंदे, डीन डॉ. गुलेचा, विभागप्रमुख डॉ. नाकतोडे, डीन डॉ. ए.एस. माहेश्वरी आणि विद्यार्थी.

--------------------

आज शिंगाडा तलाव येथे रक्तदान

नाशिक : ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत शहरात शिंगाडा तलाव येथील फायर ब्रिगेड कार्यालयात सीटूप्रणीत कर्मचारी संघटना तसेच नाशिक ब्लड सेंटरच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Blood donation campaign