येवला काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:38 PM2021-06-02T20:38:27+5:302021-06-03T00:10:23+5:30

येवला : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Blood donation camp by Congress to Yeola | येवला काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

येवला काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

Next
ठळक मुद्देनवजीवन रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर

येवला : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

नवजीवन रक्तपेढीच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रमेश कहांडोळ यांच्या हस्ते झाले. शिबिरात ६३ नागरिकांनी रक्तदान केले. कार्यक्रमास बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, अ‍ॅड. समीर देशमुख, प्रीतम पटणी, धर्मराज जोपळे, बळीराम शिंदे, नानासाहेब शिंदे, संजय सोमासे, चांगदेव खैरे आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp by Congress to Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.