आंदोलनकर्त्या डॉक्टरांकडून रक्तदान

By Admin | Updated: July 6, 2014 00:15 IST2014-07-06T00:08:12+5:302014-07-06T00:15:51+5:30

आंदोलनकर्त्या डॉक्टरांकडून रक्तदान

Blood donation by agitating doctors | आंदोलनकर्त्या डॉक्टरांकडून रक्तदान

आंदोलनकर्त्या डॉक्टरांकडून रक्तदान

 

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपाची दखल न घेता, उलट त्यांच्याविरुद्ध मेस्मांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी सरकारच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी रक्तदान करून दीडशे बाटल्या रक्तसंकलित केले. शासनाच्या या निर्णयाचा जिल्हा शल्यचिकित्सक तसेच विशेषज्ञ संवर्ग एकच्या अधिकाऱ्यांनीही निषेध करून सोमवारपासून संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलनाला बसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्याम अष्टेकर यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्तकेला. सदरचे आंदोलन चिघळविण्यास आरोग्य सचिव सुजाता सौनिक व वित्त सचिव श्रीवास्तव हेच जबाबदार असून, ग्रामीण भागात रुग्णांचे हाल व मृत्यूस तेच कारणीभूत असल्याचा आरोप मॅग्मो संघटनेने प्रसिद्धिपत्रकान्वये केला आहे, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना मेस्मा लावण्याबाबत आरोग्यमंत्री व आरोग्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता लागू केल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.
मेस्माच्या निषेधार्थ जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व संवर्ग वर्ग एकचे अधिकारी सोमवारपासून संपात उतरणार असून, त्यामुळे हे आंदोलन आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्तकेली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Blood donation by agitating doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.