सिन्नरच्या शिबिरात १८८ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:42+5:302021-05-10T04:14:42+5:30

विविध रुग्णालयांत रक्ताची कमतरता भासत असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून सुचवण्यात आले होते. रक्ताची निकड विचारात घेता रुग्णांचे ...

Blood donation of 188 people in Sinnar camp | सिन्नरच्या शिबिरात १८८ जणांचे रक्तदान

सिन्नरच्या शिबिरात १८८ जणांचे रक्तदान

विविध रुग्णालयांत रक्ताची कमतरता भासत असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून सुचवण्यात आले होते. रक्ताची निकड विचारात घेता रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळाचे किरण खाडे, महेश जाधव त्यांनी शिवबापुरात रक्तदान शिबिर घेतले. त्यास नागरिकांचा प्रतिसाद लाभला.

शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, गटनेते हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, नारायण वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, पंचायत समिती सदस्य संगीता पावसे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, नगरसेवक पंकज मोरे, गोविंद लोखंडे, अनिल सरवार, राहुल कुंदे, शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे, पिराजी पवार, निखिल उगले, ललित तनपुरे, रोशन शहाने, रवि गिरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

समता ब्लड सेंटरच्या वतीने अमृता संसारे, अश्विनी झांबरे, स्वाती जाधव, भावना सैंदाने, मनेज्योतसिंग सहल, तुषार देवरे यांचे सहकार्य लाभले.

इन्फो...

प्लाझ्मा दानासाठी २७ जणांची नोंदणी

काही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होण्यासाठी प्लाझ्माची गरज भासते. तथापि वेळेवर ते उपलब्ध होत नसल्याने रुग्णाच्या नातलगांसह डॉक्टरांची धावपळ होते. त्यासाठी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास २७ जणांनी प्रतिसाद दिला. बोलावणे होताच संबंधित नागरिक प्लाजमा दानासाठी उपलब्ध होणार आहेत.

इन्फो..

गतवर्षीपेक्षा जास्त रक्त संकलन करण्याची तयारी

आयोजक किरण खाडे, महेश जाधव यांनी गतवर्षी टप्प्याटप्प्याने चार रक्तदान शिबिरे घेतली होती. त्यात तब्बल ६५३ जणांनी रक्तदान केले होते. यंदा यापेक्षाही जास्त संकलन करण्याचा मानस खाडे, जाधव, जनसेवा मंडळ, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे.

Web Title: Blood donation of 188 people in Sinnar camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.