चारित्र्याच्या संशयावरून खून

By Admin | Updated: December 10, 2015 22:33 IST2015-12-10T22:32:34+5:302015-12-10T22:33:50+5:30

चारित्र्याच्या संशयावरून खून

Blood on character suspicion | चारित्र्याच्या संशयावरून खून

चारित्र्याच्या संशयावरून खून


नाशिक : नांदगाव कोहली शिवारातील खुंटपाड्याचा रहिवासी सुभाष काळू गावित या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे़ चारित्र्याच्या संशयावरून या युवकाचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, संशयित दशरथ किसन जाधव (२८) व रामदास पांडुरंग अहेर (३५, दोघेही रा़ नांदगाव कोहळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़
शेतात कामास जातो असे सांगून गेलेल्या सुभाष गावित या तरुणाचा उदार यांच्या भाताच्या शेतात
रविवारी (दि़ ६) मृतदेह आढळून आला होता़ या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, अनिल धुमसे, रवींद्र वानखेडे, राजेंद्र पाटील, अशोक मोकळ, जे़ के. सूर्यवंशी, राजेंद्र लहारे, लहू भावनाथ, संदीप हांडगे, प्रदीप बहिरम, प्रवीण काकड, विश्वनाथ गायकवाड यांच्या साहाय्याने तपास केला़
या खुनातील संशयित रामदास अहेर विरोधात बलात्काराचा गुन्हा आहे़ प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, सहायक पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा तपास केला़

Web Title: Blood on character suspicion