डॉक्टरविरोधात रास्ता रोको; मालेगावी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST2021-05-04T04:07:26+5:302021-05-04T04:07:26+5:30
पोलीस कर्मचारी गोविंदा बिऱ्हाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसानी संशयित अतिक अहमद मोहियुद्दीन(२९ रा.इस्लामाबाद), जियाउर रहेमान ...

डॉक्टरविरोधात रास्ता रोको; मालेगावी गुन्हा दाखल
पोलीस कर्मचारी गोविंदा बिऱ्हाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसानी संशयित अतिक अहमद मोहियुद्दीन(२९ रा.इस्लामाबाद), जियाउर रहेमान जावेद अहमद अन्सारी (रा. सरदार मार्केटसमोर, ऐतशाम) (पूर्ण नाव माहीत नाही) अतिक अहमद मुख्तार अहमद (रा. इस्लामपुरा), मयोद्दीन मोहमद मुनिर (रा. इस्लामपुरा), अली हसन लाल मोहंमद (रा.न्यू बस्ती गोल्डननगर), नुमान मलिक (रा. रमजानपुरा), हमजा रजा (रा.रमजानपुरा), अस्लम बिल्डर (रा. हकिमनगर) व इतर पाच ते सहा जण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी भिक्कु चौक ते नेहरू चौककडे जाणाऱ्या सार्वजनिक मार्गावर तोंडाला मास्क न लावता व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता विना परवानगी बेकायदेशीररीत्या डॉक्टरांच्या विरोधात रस्ता रोको करून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना तसेच लोकांना अडथळा निर्माण केला. कोरोना विषाणूंचे थैमान चालू असताना संशयितांनी कोरोना संसर्ग पसरविण्यास कारणीभूत होईल, असे माहीत असूनही लोकांची गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक कदम करीत आहेत.