आनंदवलीत एकावर धारदार शस्त्राने वार
By Admin | Updated: May 11, 2014 23:53 IST2014-05-11T23:51:31+5:302014-05-11T23:53:37+5:30
नाशिक : विवाहाच्या दिवशी नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून कुरापत काढून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आनंदवली येथे घडली आहे़ या प्रकरणी सात संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़

आनंदवलीत एकावर धारदार शस्त्राने वार
नाशिक : विवाहाच्या दिवशी नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून कुरापत काढून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आनंदवली येथे घडली आहे़ या प्रकरणी सात संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदवलीतील आकाश गलांडे याचा ९ मे रोजी विवाह होता़ या विवाहाच्या मिरवणूकप्रसंगी नाचताना धक्का लागल्याची कुरापत काढून संशयित अतुल अरुण गलांडे, अक्षय अनिल गलांडे, तुषार ऊर्फ बंटी ज्ञानेश्वर आढाव, धनराज रवींद्र जाधव (रा़ आनंदवली) यांनी दीपक ठाकरे, कुणाल मिसाळ, जितेंद्र बेंडकुळे यांना रात्री दहा वाजता मारहाण करण्यास सुरुवात केली़ या सर्वांना सोडविण्यास गेलेल्या दीपक परशराम शेवरे (१८, रा़ शेवरे चाळ, आनंदवली) याच्यावर संशयित बंटी आढाव याने धारदार शस्त्राने पोट, छाती आणि मानेवर वार केले़
या प्रकरणी दीपक शेवरे याने गंगापूर पोलिसांत दिलेल्या फि र्यादीनुसार अतुल गलांडे, अक्षय गलांडे, तुषार आढाव, धनराज जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या चौघांनाही गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ (प्रतिनिधी)