शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

अंध दाम्पत्यांचा विवाह; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 4:26 PM

‘मुद्रा’चा पुढाकार : संसारोपयोगी साहित्य भेट

ठळक मुद्दे प्रतिभा होळकर यांनी सामाजिक ऋणानुबंधातून हा उपक्र म घेतल्याचे सांगितले

नाशिक - द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन आणि मराठा मुद्रा महिला मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दोन दाम्पत्यांचा विवाह सोहळा लावून देण्यात आला. तसेच, गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट सुकर व्हावी, या हेतूने ६० विद्यार्थ्यांना पुस्तकांसह शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.श्रीकृष्ण लॉन्समध्ये आयोजित या अभिनव सोहळ्याला आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांसह उद्योजक अजित बने, हिरामण आहेर, नगरसेविका स्वाती भामरे, ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष अरु ण भारस्कर आदींच्या हस्ते कार्यक्र माचा शुभारंभ झाला. यावेळी नवदांपत्यांना मान्यवरांनी शुभेच्छा देताना आमदार प्रा. फरांदे म्हणाल्या की, दृष्टीहिनांनादेखील सामाजिक कार्याची चांगली दृष्टी असते, हे या उपक्र मातून दिसले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगासाठी पाच टक्के निधी राखीव असतो. त्याचा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी उपयोग केला जातो आहे. त्यासाठी नावनोंदणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रतिभा होळकर यांनी सामाजिक ऋणानुबंधातून हा उपक्र म घेतल्याचे सांगितले. सोहळ्यात वेदमंत्रांच्या घोषात सोनाली सुरासे आणि राजेंद्र पाटील तसेच अब्दुल दस्तगीर शेख - नजीर शेख यांचा विवाह उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. मुद्रा मराठा मंडळाने या नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्याचीही भेट दिली. कार्यक्र माला कल्पना पांडे, शालिनी पिंगळे, प्रतिभा पाटील, कुंदा भालेराव, मनिषा पाटील, विजया बोराडे, शिल्पा गायकवाड, विजया पाटील, वैशाली आहेर आदी उपस्थित होत्या.मनपातर्फे प्रशिक्षण केंद्रमहापालिका आयुक्त गमे यांनी महापालिकेच्या वतीने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, हा या केंद्राच्या उभारणीमागील प्रमुख हेतू आहे. राखीव पाच टक्के निधीतून दिव्यांगांसाठी संगणक प्रशिक्षण, वाचनालयासारखे उपक्र म राबविण्याची गरज आहे. त्यासाठी ब्लाइंड वेल्फेअरसारख्या संस्थांनी प्रस्ताव दिल्यास त्याचा निश्चित विचार होईल, अशी ग्वाहीदेखील पालिका आयुक्तांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक