अंध कलावंतांनी जिंकली रसिकांची मने

By Admin | Updated: December 21, 2015 23:44 IST2015-12-21T23:40:48+5:302015-12-21T23:44:21+5:30

अंध कलावंतांनी जिंकली रसिकांची मने

Blind artists won the hearts of entertainers | अंध कलावंतांनी जिंकली रसिकांची मने

अंध कलावंतांनी जिंकली रसिकांची मने

नाशिक : अंध-अपंग कलावंतांना कला सादर करण्याची संधी मिळण्याच्या उद्देशाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या वतीने ‘सूरदृष्टी’ प्रकल्प सुरू करण्यात आला असून, या प्रकल्पाच्या वतीने संगीतमय कार्यक्रम रंगला.
सिन्नर येथील त्र्यंबकबाबा भगत व ज्येष्ठ उद्योजक किसनलाल सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमात निशा जाधव यांनी मराठी, हिंदी, राजस्थानी, गुजराथी गीते सादर केली. अकबर खान यांनी हिंदी गझला, तर अमरावती येथील अंध गायक रिझवान पटेल यांनी विविध कव्वाली पेश केल्या. नरेंद्र जाधव यांनी सिंथेसायझरची साथ केली. अभिजित वैद्य (तबला), लकी (आॅक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. श्रीपाद कोतवाल यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, ज्योती आव्हाड, विनोद जाजू, जयप्रकाश जातेगावकर, बाळासाहेब घोरपडे, निशिकांत अहिरे आदिंसह श्रोते उपस्थित होते. अशोक बंग यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Blind artists won the hearts of entertainers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.