आढळल्या रिकाम्या गोण्या : नोटीस बजावणारबोगस खतांच्या
By Admin | Updated: October 15, 2015 23:54 IST2015-10-15T23:44:51+5:302015-10-15T23:54:56+5:30
संशयावरून आरईत छापा

आढळल्या रिकाम्या गोण्या : नोटीस बजावणारबोगस खतांच्या
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून गुरुवारी (दि. १५) सायंकाळी भरारी व गुणवत्ता निरीक्षक पथकाने बागलाण तालुक्यातील आरई येथे एका खत विक्रेत्या दुकानावर छापा टाकला. छाप्यात विद्राव्य खतांच्या आठ रिकाम्या गोण्या आढळल्याने खत विक्रेत्यास याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बोगस खते बनविण्याच्या तक्रारीवरून छापा टाकण्यास गेलेल्या भरारी पथकाला रिकाम्या गोण्यांचा पंचनामा करण्याची वेळ आली. काल दुपारी कृषी विभागात याबाबतची तक्रार येताच जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे, जिल्हा मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी आरई (बागलाण) येथे जाण्याचा निर्णय घेतला. आरई येथे संतोष बोरसे नामक खते विक्रेत्याच्या दुकानात छापा टाकला असता तेथे पुणे येथील एका कंपनीच्या नावे नवीन कोऱ्या विद्राव्य खतांच्या आठ रिकाम्या गोण्या आढळल्या. या नवीन खतांच्या रिकाम्या गोण्या कशा? अशी विचारणा यावेळी पथकाने बोरसे यांच्याकडे केली.
या दुकानात बोगस खते बनविण्यात येत असल्याचा कृषी विभागाच्या भरारी पथकाला संशय असून, खत विक्रेत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस व कृषी अधिकारी सुनील विटनोर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)