शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कामटवाडे शिवारात  शाळकरी मुलीवर  ब्लेडने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:44 IST

शालेय मुलांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा सिडको परिसरातील कामटवाडे शिवारात आला. एका वर्गात शिकत असलेल्या मुलाने आपल्या अन्य मित्रांच्या मदतीने नववीच्या विद्यार्थिनीची छेड काढून तोंड दाबत मानेवर व शरीराच्या अन्य भागांवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सिडको : शालेय मुलांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा सिडको परिसरातील कामटवाडे शिवारात आला. एका वर्गात शिकत असलेल्या मुलाने आपल्या अन्य मित्रांच्या मदतीने नववीच्या विद्यार्थिनीची छेड काढून तोंड दाबत मानेवर व शरीराच्या अन्य भागांवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कामटवाडे शिवारातील वृंदावननगरमधील रहिवासी असलेली शाळकरी मुलगी किराणा दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडली. यावेळी एका अल्पवयीन मुलाने तिचा पाठलाग करून हात धरला. ‘तू माझ्यावर प्रेम कर’ असे सांगून तोंड दाबत ब्लेडने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांपैकी कोणीतरी तिच्या हातात एक चिठ्ठी दिली. पोलिसांनी ती चिठ्ठी प्राप्त करून त्यावरील मजकूर आणि हस्ताक्षराबाबतही पडताळणी केली. दरम्यान, पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक खांडवी यांनी तपास सुरू केला. दरम्यान, घटनेच्या दिवशी संशयित अल्पवयीन मुलांपैकी एक उत्तर प्रदेशमध्ये तर दुसरा आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे तर तिसरा त्या दिवशी व्यवसाय करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी मुलीचा जबाब आणि तपासामधून पुढे आलेले तथ्य व पोलिसांनी नोंदविलेले बारकावे विसंगत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. पीडित मुलीचा जबाब आणि तपासाअंती मिळालेली माहिती व पुराव्यांमध्ये तफावत असून, तीन वर्षांपूर्वी पीडित मुलगी आणि संशयित अल्पवयीन मुले एकाच शाळेत शिकत होते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पीडित मुलीने दिलेला जबाब पडताळणीसाठी पोलिसांकडून मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. पीडित मुलीने स्वत:हून ब्लेडने वार करून घेण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविली जात आहे.दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नपीडित मुलीने दिलेला जबाब आणि तपासातून हाती लागलेली माहिती यामध्ये तफावत आढळली आहे. या मुलीने यापूर्वी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुलीची मानसिकता आणि तिने असा जबाब का दिला हे तपासण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन तिचे समुपदेशन केले जाणार आहे. तपासातील तथ्य व फिर्यादीच्या जबाबामध्ये तफावत दिसत असून तिच्याकडून मिळालेल्या चिठ्ठीमधील मजकुराचे हस्ताक्षरही भिन्न आहे. संशयित मुले अल्पवयीन असून, त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे.- सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा