शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

काळविटाची शिकार करणाऱ्यास कोठडी

By admin | Updated: June 12, 2017 00:47 IST

ममदापूर संवर्धन : उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक

लोकमत न्यूज नेटवर्कममदापूर : काळविटाची शिकार करणाऱ्या मालेगाव येथील दस्तगीर मोहम्मद हारून याला १६ जूनपर्यंत वनविभागाची कोठडी सुनावण्यात आली आहे. चार आरोपींना अटक करण्यासाठी तसेच पुढील तपास करण्यासाठी पोलीस आणि वन अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मालेगावच्या पाच शिकाऱ्यांनी ममदापूर संवर्धन राखीव अंतर्गत येणाऱ्या कोळम येथील जंगलात एका काळविटाची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर हरीण गाडीमध्ये टाकण्यासाठी उचलताना राजापूर येथील संतोष चव्हाण, कोळम येथील राजेंद्र आवारे व नाना चव्हाण यांनी पाहिले व स्वत: जिवाची पर्वा न करता बंदुकधारी शिकाऱ्याशी दोन हात करत दस्तगीर मोहम्मद या एका शिकाऱ्याला गाडीच्या खाली ओढले. दरम्यान, उर्वरित चौघे शिकारी पळून गेले. यापूर्वी २७ जुलै २००९ रोजी मालेगाव येथील चार शिकाऱ्यांनी दोन हरिणांची रेंडाळा भागात शिकार करून पलायन करतानाच खरवंडी येथील लोकांनी पकडून यथेच्छ चोप दिला होता. तसेच शिकाऱ्यांची गाडीदेखील पेटवून दिली होती, तेव्हाची अर्धवट जळालेली गाडी अद्यापही राजापूर येथील फॉरेस्ट कॉलनीत आहे. बाकी स्थानिक लोकांनी जीव धोक्यात घालून पकडलेल्या आरोपींचे काय झाले? या आरोपींना शिक्षा झाली की ताबडतोब सुटका केली. याविषयी कोणतीही माहिती वनविभागाने दिली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. या भागात वनविभागाचे पगारी कर्मचारी असतानाही राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, कोळम, भारम या भागातील शेतकरी हरिणांची जिवापाड देखभाल करतात. उभ्या पिकांची नासाडी केली तरी शेतकरी या हरिणांचे रक्षण करतात, सन २००९ मधील काळविटाची शिकार झालेल्या घटनेतील आरोपी व त्यांच्यावरील कारवाई गुलदस्त्यात आहे. मध्यंतरी हरिणांची शिकार करण्याकरिता मालेगाव परिसरातून टोळकी रात्रीच्या वेळेला येत असल्याची चर्चा या वनविभागाच्या परिसरात होती. अनेकदा गोळीबारीचे आवाजही ऐकल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून शिकाऱ्याशी दोन हात केले; मात्र वनविभागाचे पगारी अधिकारी व कर्मचारी हे नेमके करतात तरी काय ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दिवसा जर हरिणांची शिकार होते आहे तर रात्री काय घडत असेल अशा चर्चांना उधाण आले आहे. आता या चार आरोपींना किती दिवसात पकडण्यात पोलिसांना यश येते आणि आरोपपत्र दाखल होऊन आरोपींना कधी शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.