मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

By Admin | Updated: February 27, 2015 00:05 IST2015-02-27T00:04:51+5:302015-02-27T00:05:09+5:30

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

The black flag will be shown to the Chief Minister | मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

नाशिक : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या खुनातील सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला असून, त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस-आंदोलकांत तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला होता. उद्या (दि. २७) जनस्थान पुरस्कार वितरण समारंभासाठी मुख्यमंत्री पुन्हा नाशिकला येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय भाकपच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत दत्तात्रय बनकर, राजू देसले यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: The black flag will be shown to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.