मालेगाव मनपाच्या राजकारणात भाजपचे संख्याबळ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:52+5:302021-09-26T04:15:52+5:30

महापालिकेची स्थापना १७ डिसेंबर २००१ मध्ये झाली. यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ शून्य होते. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मालेगाव ...

BJP's strength increased in Malegaon Municipal Corporation politics | मालेगाव मनपाच्या राजकारणात भाजपचे संख्याबळ वाढले

मालेगाव मनपाच्या राजकारणात भाजपचे संख्याबळ वाढले

महापालिकेची स्थापना १७ डिसेंबर २००१ मध्ये झाली. यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ शून्य होते. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मालेगाव शहर विकास आघाडीचे सुनील गायकवाड, मदन गायकवाड, तृप्ती जाधव, मनीषा हिरे हे निवडून गेले होते. नंतरच्या काळात मालेगाव शहर विकास आघाडीचे भाजपात विलीनीकरण झाले. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ९ सदस्य निवडून गेले. महापालिकेच्या राजकारणात भाजपचे संख्याबळ वाढले आहे. शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपमध्ये सरळ सामना होणार आहे. भाजपचे गटनेते सुनील गायकवाड, महानगर प्रमुख मदन गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरेश निकम आदींनी शिवसेनेचा वारू रोखण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी व महापालिकेच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. सोयगाव नववसाहत, कॅम्प, कलेक्टरपट्टा, बारा बंगला परिसरातील प्रभागांमध्ये भाजप निवडणूक लढविणार आहे. भाजपपुढे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

Web Title: BJP's strength increased in Malegaon Municipal Corporation politics