भाजपाचा खासगीकरणावर भर
By Admin | Updated: March 24, 2017 00:32 IST2017-03-24T00:32:01+5:302017-03-24T00:32:13+5:30
नाशिक : महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती. अशा बिकटप्रसंगी सत्तारूढ झालेल्या भाजपाने अनेक प्रकल्प खासगी एजन्सीच्या माध्यमातून साकारण्यावर भर देण्याचे ठरविले आहे.

भाजपाचा खासगीकरणावर भर
नाशिक : केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असले तरी प्रत्येकवेळी निधी मिळेलच असे नाही, त्यात महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती. अशा बिकटप्रसंगी सत्तारूढ झालेल्या भाजपाने बांधकामासह इतर अनेक प्रकल्प खासगी एजन्सीच्या माध्यमातून साकारण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. तसे संकेतच महापौर रंजना भानसी यांनी बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिले.
महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.२३) बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीलाच महापौरांनी अधिकाऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, असा सवाल उपस्थित केला. परंतु, उत्पन्नवाढीचे स्त्रोत सांगण्याऐवजी अधिकाऱ्यांनी रिंगरोडसह आरक्षित जागांवर कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प साकारण्याला अधिक पसंती दिली. शहर अभियंता उत्तम पवार यांनी शहरात आणखी काही रस्ते जोडण्यासाठी नवीन रिंगरोडचा प्रस्ताव समोर ठेवला. त्यावर महापौरांनी येत्या पंधरा दिवसांत प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आणि लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारकडून निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. याचवेळी महापौरांनी शहरातील क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक, उद्याने उद्योजक-प्रायोजकांच्या माध्यमातून साकारण्याचा मनोदय व्यक्त केला. अनेक उद्योजक आपल्या संपर्कात असून, बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, शहर अभियंता उत्तम पवार व अधिकारीवर्ग.