मनमाडला भाजपचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:29+5:302021-09-04T04:18:29+5:30

मनमाड : कोणतीही शासकीय सार्वजनिक सुटी नसताना वारंवार बंद आढळून येणाऱ्या मंडल कार्यालयासमोर शहर भाजपच्या वतीने ठिय्या आंदोलन ...

BJP's sit-in agitation in Manmad | मनमाडला भाजपचे ठिय्या आंदोलन

मनमाडला भाजपचे ठिय्या आंदोलन

मनमाड : कोणतीही शासकीय सार्वजनिक सुटी नसताना वारंवार बंद आढळून येणाऱ्या मंडल कार्यालयासमोर शहर भाजपच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आज कोणतीही सुटी नसताना मंडल कार्यालय बंद होते, तर या ठिकाणी कोणीही जबाबदार कर्मचारीदेखील हजर नव्हते. या बाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्कल कार्यालयात व्यक्तिगत कामकाजासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला असता नेहमी असे कार्यालय विनाकारण बंद असते, असे सांगण्यात आले. संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन संघवी, सचिन लुणावत यांच्या नेतृत्वाखाली बंद असलेल्या सर्कल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. याबाबत

निषेध करणारा फलकही कार्यकर्त्यांनी बंद दारावर लावला. सुमारे दीड तास भाजपा कार्यकर्त्यांनी बेजबाबदार तहसील प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. तेव्हा कुठे प्रशासनला जाग आली आणि नव्याने नियुक्ती झालेल्या तहसीलदारांनी जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांच्याशी मोबाइल फोनद्वारे संपर्क करून मनमाड सर्कल कार्यालयाच्या गैरव्यवस्थासंदर्भात गंभीर दखल घेऊ, असे सांगितले. यावेळी नीळकंठ त्रिभुवन, सरचिटणीस एकनाथ बोडखे, शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, सचिन कांबळे,

आनंद बोथरा, आनंद काकडे, अकबर शहा, बुधन बाबा शेख, अनंता भामरे, सुमेर मिसर, नारायण जगताप किरण उगलमुगले, मकरंद कुळकर्णी, प्रमोद जाधव, हरीश चिंतामणी, दीपक पगारे, सुधीर उबाळे, पापा भाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

--------------------

मनमाड मंडल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना नितीन पांडे, जयकुमार फुलवाणी, सचिन संघवी, सचिन लुणावत, नीळकंठ त्रिभुवन, एकनाथ बोडखे, संदीप नरवडे, सचिन कांबळे, आनंद बोथरा आदी.

(०३ मनमाड २)

030921\03nsk_21_03092021_13.jpg

०३ मनमाड २

Web Title: BJP's sit-in agitation in Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.