शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:02 IST

येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.

नाशिक : येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.  अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी (दि.२५) आयोजित संविधान जागर सभेत कौर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर राज्य सरचिटणीस श्याम काळे, सुकुमार दामले, मोहन शर्मा, कृष्णा भोईर, दिली उताणे, सुमन पुजारी, जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, रावसाहेब ढेमसे, सुवर्णा मेतकर, विजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कौर म्हणाल्या, भाजपाचे सरकार देशात व महाराष्टÑात असून या सरकारकडून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर हल्ला चढविला जात आहे. त्यामुळे संविधानाचा जागर करण्याची वेळ आली आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी येत्या दि.९ जानेवारीला रस्त्यावर सर्व कामगार कष्टकरी उतरून सरकारवर हल्लाबोल करणार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असे कौर यावेळी म्हणाल्या. दरम्यान, आयटकची राज्य कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. सी. एन. देशमुख यांची राज्य अध्यक्षपदी, तर दिलीप पवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.हाताल लाल बावटा घेत घोषणाबाजीअधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्ताने दुपारी द्वारका ते बोधलेनगरपर्यंत पुणे महामार्गावरून आयटकच्या वतीने ‘संविधान बचाव फेरी’ काढण्यात आली. आयटकचा झेंडा हातात घेत शेकडो शेतकरी श्रमिक वर्ग या फेरीमध्ये सहभागी झाले होते. आशा सेविकांची संख्या यामध्ये लक्षणीय होती. ‘कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा द्या, कंत्राटी कामागारांना कायम करा, बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा आदी मागण्यांचे फलक यावेळी कामगारांनी झळकाविले.मोदी केवळ खोटी आश्वासने देऊ शकतातसार्वजनिक क्षेत्र संपुष्टात आणून कंत्राटी व खासगीकरणावर भाजपाचे सरकार भर देत आहेत. बहुतांश क ष्टकऱ्यांना कामागारांचा दर्जा दिला गेला नाही, त्यामुळे त्यांना सगळ्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. शेतकरी व शेतमुजरांची मागील चार वर्षांपासून मोदी सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याची टीका कौर यांनी यावेळी बोलताना केली. खोटी आश्वासने देण्यापलीकडे भाजपा सरकारला काहीही करता आले नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कामगारांना देशोधडीला लावले. हजारो ते लाखो कामगारांना नोकºयांवर पाणी सोडावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी