शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

मंजूर कामांना भाजपाची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:00 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी महासभा व स्थायी समितीने मंजूर केलेल्या कामांना भिरकावून लावल्याने नगरसेवकांसाठी बेचव झालेले सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक रूचकर करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने मंजूर कामांचा समावेश करत फोडणी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आयुक्तांनी अगोदरच ३३१ कोटींनी फुगवलेल्या अंदाजपत्रकात आणखी सुमारे २५० ते ३०० कोटींची भर पडण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रक दोन हजार कोटी रुपयांच्या पुढे पल्ला गाठणार आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी महासभा व स्थायी समितीने मंजूर केलेल्या कामांना भिरकावून लावल्याने नगरसेवकांसाठी बेचव झालेले सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक रूचकर करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने मंजूर कामांचा समावेश करत फोडणी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आयुक्तांनी अगोदरच ३३१ कोटींनी फुगवलेल्या अंदाजपत्रकात आणखी सुमारे २५० ते ३०० कोटींची भर पडण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रक दोन हजार कोटी रुपयांच्या पुढे पल्ला गाठणार आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सन २०१८-१९ या वर्षासाठी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी (दि.२२) स्थायी समितीला सादर केले. या अंदाजपत्रकात आयुक्तांनी गतवर्षाच्या तुलनेत ३३१.७५ कोटी रुपयांची भर घातली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाज पत्रक १४५३.३९ कोटी रुपयांवर ठेपले. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनीच ३३१ कोटी रुपयांची भर घातल्यानंतर स्थायी समितीसह महासभेकडून त्यात फारसा बदल केला जाणार नसल्याची अटकळ बांधली जात होती. परंतु, अंदाजपत्रकात मागील वर्षभरात महा सभेसह स्थायी समितीने मंजूर केलेल्या असंख्य कामांचा समावेश नसल्याने सत्ताधारी भाजपात अस्वस्थता पसरली आहे. नगरसेवकांनीही त्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह महापौरांकडे याबाबत नाराजीचा सूर लावला. त्यामुळे, आयुक्तांच्या इशाºयाकडे दुर्लक्ष करत स्थायी समितीसह महासभेकडून गेल्या वर्षभरात मंजूर झालेल्या आणि निविदाप्रक्रियेत असलेल्या तसेच काही कार्यादेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांचा समावेश अंदाजपत्रकात केला जाणार आहे. स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर-आडके यांच्यासह महापौर रंजना भानसी यांच्याकडून अंदाजपत्रकात प्रामुख्याने महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पांचा समावेश केला जाणार असून, काही योजनांसाठीही तरतूद केली जाणार आहे.२५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांतील काही अत्यावश्यक कामांची अंदाजपत्रकात भर घालत नगरसेवकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे, स्थायी समितीसह महासभेकडून अंदाजपत्रकात सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांची भर पडून ते २१०० कोटींच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकासंदर्भात भाजपाने शनिवारी (दि.२४) नगरसेवकांची बैठक बोलाविली असून, त्यात सूचना घेऊन कामांचा समावेश केला जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा