गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदेालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST2021-03-22T04:13:34+5:302021-03-22T04:13:34+5:30
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी ...

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदेालन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप पत्रात केला आहे. या घटनेचा भाजपाने निषेध केला असून, रविवार कारंजा येथे घोषणाबाजी करण्यात आली. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासह राज्य सरकार बरखास्त करण्याचे व महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलन प्रसंगी लक्ष्मण सावजी, सुनील केदार, हिमगौरी आडके, अमित घुगे, संतोष नेरे, ॲड.अजिंक्य साने, प्रदीप पेशकार, प्रा.कुणाल वाघ, सुनील बच्छाव, नंदकुमार देसाई, भास्कर घोडेकर, नीलेश बोरा, अविनाश पाटील, चंद्रशेखर पंचाक्षरी, हेमंत गायकवाड, ज्ञानेश्वर काकड आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
===Photopath===
210321\21nsk_2_21032021_13.jpg
===Caption===
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करतांना भाजपाचे कार्यकर्ते