शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या अनुदानवाढीसाठी भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:44 IST

जिल्हा व शहर भाजपच्या वतीने गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये प्रतीलिटर अनुदान व दूध पावडरला प्रती किलो ५० रुपये अनुदानाच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

नाशिक : जिल्हा व शहर भाजपच्या वतीने गायीच्या दुधाला सरसकट दहा रु पये प्रतीलिटर अनुदान व दूध पावडरला प्रती किलो ५० रुपये अनुदानाच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.दुधाला अनुदान मिळालेच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणादेखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्या. तसेच जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसंग्राम पार्टीचे प्रदेश अध्यक्ष विनायक मेटे, भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खासदार भारती पवार, भाजपानाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, अध्यक्ष रासप उत्तर महाराष्ट्र राजेंद्र पाथोरे, जिल्हाध्यक्ष अरु ण आव्हाड, शहराध्यक्ष विलास पलंगे, जिल्हाध्यक्ष आरपीआय(ए) प्रकाश लोंढे, जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम अमित जाधव आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये १५० लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते. त्यापैकी ३० लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दूध खासगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते.मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्र ीमध्ये ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खासगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध २० ते २२ रु पये दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही. शासनाने दहा लाख लिटर दूध २५ रु . प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केल्या जात असल्याचा आरोपही निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्ष, शिवसंग्राम, रासप, आरपीआय, रयतक्र ांती व संलग्न पक्षाच्या निवेदनात केला आहे. सर्व शेतकरी बांधवांसह दि. १ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. 

 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा