त्र्यंबकेश्वर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील श्रीपंचायती निरंजनी अखाडा येथील हॉलमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संघ जिल्हा कार्यवाह कृष्णा घरोटे, प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रवीण अलाई, जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, उद्योग आघाडी प्रदेश पदाधिकारी सोनल दगडे- कासलीवाल, जिल्हा पदाधिकारी ॲड. श्रीकांत गायधनी यांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रशिक्षण वर्गाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. युवा मोर्चा अध्यक्ष विराज मुळे यांनी वर्गगीत सादर केले. भारतीय जनता पक्षाचा इतिहास, कार्य करण्याची पद्धत, सध्याची राजकीय परिस्थिती व मोदी सरकारने केलेले लोकाभिमुख कार्य तसेच भविष्यात कार्यकर्त्यांची वाटचाल याकरिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे व शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी प्रस्ताविकेत सांगितले. सूत्रसंचालन चिटणीस आरती शिंदे व उपाध्यक्ष विजू पुराणिक यांनी, तर सरचिटणीस जयराम भुसारे यांनी आभार मानले.याप्रसंगी सहा सत्राच्या अध्यक्षस्थानी त्रिवेणी तुंगार, देवका कुंभार,सचिन शुक्ल,जयराम भुसारे,बाळासाहेब अडसरे, संगीता मुळे, सुनीता भुतडा, सुनंदा टोपले, प्रवीण पाटील, विराज मुळे, आंबादास गांगोडे आदी विराजमान होते.याप्रसंगी रवींद्र गांगोली, दिनेश कोळेकर, कमलेश जोशी, पंकज धारणे, अनघा फडके, सुनील कचोळे, समीर दिघे, अभय सरडे, भाऊसाहेब झोंबाड, राजेश शर्मा, राहुल वाव्हळ, योगेश गंगापुत्र, गमे,राहुल खत्री, तेजस ढेरगे, पावन बोरसे, संजय कुलकर्णी, समाधान कालेकर, मयूर वाडेकर, भावेश शिखरे, संकेत टोके, चंद्रकांत प्रभुणे, दत्ता जोशी, अंकुश परदेशी, सतीश दुसाने, गणेश मोरे, प्रशांत बागडे, जनक गोऱ्हे, श्रीराज काण्णव, प्रकाश खाडे, अक्षय चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
त्र्यंबकेश्वरला भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:20 IST
त्र्यंबकेश्वर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील श्रीपंचायती निरंजनी अखाडा येथील हॉलमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
त्र्यंबकेश्वरला भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरला भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न