भाजपाला हवे शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ सत्तेचे धुमारे : महापौरपदासाठी करणार दावेदारी

By Admin | Updated: May 21, 2014 00:38 IST2014-05-21T00:02:12+5:302014-05-21T00:38:59+5:30

नाशिक : केंद्रात भाजपाची निर्विवाद सत्ता आल्यानंतर नाशिकमध्येही आता या पक्षाची भूमिका अधिक आक्रमक होऊ लागली आहे. शहरात ताकद वाढल्याचा भाजपाचा दावा असून, त्यामुळे शहरातील चारही मतदारसंघांवर दावा करण्याचे पक्षाने ठरविले आहे. इतकेच नव्हे, महापालिकेत मनसेबरोबर सत्तेत असलेल्या भाजपाने आता महापौरपदाची मागणी करण्याचे ठरविले आहे. त्यासंदर्भात मनसेशी लवकरच चर्चा केली जाणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी दिले आहेत.

BJP wants four Assembly constituencies to be in power: Claims for Mayor post | भाजपाला हवे शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ सत्तेचे धुमारे : महापौरपदासाठी करणार दावेदारी

भाजपाला हवे शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ सत्तेचे धुमारे : महापौरपदासाठी करणार दावेदारी

नाशिक : केंद्रात भाजपाची निर्विवाद सत्ता आल्यानंतर नाशिकमध्येही आता या पक्षाची भूमिका अधिक आक्रमक होऊ लागली आहे. शहरात ताकद वाढल्याचा भाजपाचा दावा असून, त्यामुळे शहरातील चारही मतदारसंघांवर दावा करण्याचे पक्षाने ठरविले आहे. इतकेच नव्हे, महापालिकेत मनसेबरोबर सत्तेत असलेल्या भाजपाने आता महापौरपदाची मागणी करण्याचे ठरविले आहे. त्यासंदर्भात मनसेशी लवकरच चर्चा केली जाणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी दिले आहेत.
महापालिकेत मनसे आणि भाजपाची सत्ता आहे. परंतु महापालिकेबाहेर म्हणजेच राज्यात भाजपा आणि शिवसेना तसेच रिपाइंची महायुती आहे. नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपा-शिवसेना महायुतीनेच निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत मनसेने डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी दिली होती, तर सेना-भाजपाच्या वतीने हेमंत गोडसे उमेदवार होते. नाशिक शहरात पूर्व नाशिक, मध्य नाशिक, पश्चिम नाशिक आणि देवळाली हे चार मतदारसंघ असून, या चारही मतदारसंघांत हेमंत गोडसे यांना आघाडी मिळाली आहे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा हा परिणाम आहेच; परंतु आता केंद्रात भाजपा सत्तेवर असल्याने नाशिक भाजपाही आता मोलाची ठरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मतदारसंघात अदलाबदल करण्याची पक्षाची तयारी आहे. त्यानुसार सेनेने सात विधानसभा मतदारसंघ लढवावे, तर भाजपाने आठ मतदारसंघ लढवावे, अशी भाजपाची मागणी आहे. त्यातही शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडावे, अशी पक्षाची मागणी राहणार असल्याचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. भाजपाचा हा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात येणार आहे. शहरातील चारही मतदारसंघ भाजपासाठी घेताना ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघ मात्र सेनेला अधिक संख्येने सोडण्याची तयारीही सावजी यांनी दर्शविली आहे.
दरम्यान, सेनेबरोबरच आता मनसेची कोंडी करण्याची तयारी भाजपाने केली आहे. राज्यात सेना-भाजपा एकत्र असले, तरी नाशिक महापालिकेत मनसे-भाजपा युती आहे. मनसेचे चाळीस नगरसेवक असून, भाजपाच्या १४ नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत मनसेला महापौरपद आणि भाजपाला उपमहापौरपद देण्यात आले होते; परंतु आता त्यात अदलाबदल करून मनसेला उपमहापौरपद तर भाजपाला महापौरपद द्यावे अशी भाजपाची भूमिका असेल, असे सावजी यांनी सांगितले.

Web Title: BJP wants four Assembly constituencies to be in power: Claims for Mayor post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.