शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसला : समीर भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:31 IST

नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्दैवी असून, सत्ताधारी भाजपाकडून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करणे  हा नाशिककरांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे, असे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्दैवी असून, सत्ताधारी भाजपाकडूनपाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करणे  हा नाशिककरांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे, असे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.  यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिककरांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता, शहरातील तिन्ही आमदार त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि सरकारसुद्धा भाजपाचे असूनही वेळोवेळी सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले जात आहे. नाशिक शहरातील करवाढ करतानाही नाशिककरांनी सत्ताधाऱ्यांच्या नौटंकीचा अनुभव घेतला आहे.  नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची चिंता असताना नाशिकचे पाणी डोळ्यादेखत जाणे हे अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे जलसंपदा विभागाचे मंत्री हे नाशिकचे पालकमंत्री असताना नाशिकचे पाणी पळविले जाणे ही सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांची दिशाभूल आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधाºयांकडून गंगापूरमधील पाण्यासाठी विषय घेतला जातो, हा नाशिककरांच्या भावनांशी खेळ आहे. नाशिक शहरातील सत्ताधाºयांनी नाशिकचे दत्तक पिता मुख्यमंत्री व नाशिकचे पालकमंत्री असलेले जलसंपदामंत्री यांच्याकडे जाऊन नाशिकमधील तीव्र दुष्काळाची वस्तुस्थिती लक्षात आणून देण्याची आवश्यकता होती. जायकवाडीला सोडल्या जाणाºया पाण्याबाबत न्यायालयाचा निर्णय म्हणून सरकारकडून सांगितले जाते.अन्याय न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावाकोर्टाने निर्णय दिला असे सांगून हात झटकायचे; मात्र नाशिककरांवर होणारा अन्याय सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे ही सरकारची जबाबदारी नाही काय? असा सवालही समीर भुजबळ यांनी केला आहे. नाशिककरांच्या हक्काचे पाणी राजकीय लाभाकरिता इतरत्र देणे हे सत्ताधाºयांना शोभनीय नसल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीBJPभाजपा