शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला जडला विस्मरणाचा विकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:51 IST

नाशिक- शहरातील खड्डे प्रकरणावर भाजपा वर शिवसेना आणि राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली असताना आता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेली आहे. मनसे बरोबर सत्ता भोगणा-या भाजपाला आता शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा विकार जडला आहे, खड्डे पडल्याने दोषींवर कारवाई करण्याचे सोडून हा पक्ष मनसेवर खापर फोडत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी केला आहे.

ठळक मुद्देमनसेची टीका: मलिद्यात वाटेकरी झाल्याचा बोरस्ते यांचा आरोप

नाशिक- शहरातील खड्डे प्रकरणावर भाजपा वर शिवसेना आणि राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली असताना आता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेली आहे. मनसे बरोबर सत्ता भोगणा-या भाजपाला आता शॉर्ट टर्म मेमरी लॉसचाविकार जडला आहे, खड्डे पडल्याने दोषींवर कारवाई करण्याचे सोडून हा पक्ष मनसेवर खापर फोडत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी केला आहे.दुसरीकडे गुणवत्ता आणि नियंत्रण विभागावर कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण करीत असून मलिद्यात त्यांचे वाटेकरी झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. शहरात सध्या पावसामुळे सर्वत्र खडे पडले आहेत त्या पार्श्वभूमीवर अजय बोरस्ते आणि रंजन ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. त्यावर उपमहापौरभिकुबाई बागुल, सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेता जगदीश पाटील यांनी उत्तर देताना भाजपाच्या चार वर्षाच्या सत्ता काळातील रस्ते चांगलेच आहेत.या आधीच्या पाच ते बारा वर्षाच्या काळात ज्यांची सत्ता होती, त्यांच्याच काळात खड्डे पडल्याचा टीका केली होती. या गेल्या पाच ते बारा वर्षात महापालिकेत मनसे आणि शिवसेनेची सत्ता होती. तसेच २०१२ मनसेच्या सत्तेला पहिल्या अडीच वर्षात भाजपचे पाठबळ होते. त्यामुळे भाजपच्या टीकेनंतर यापक्षाने देखील वादात उडी घेतली आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी व ठेकेदारावर तातडीने कारवाई होणे अपेक्षित असतांना भाजप त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कर्म दरिद्री कारभाराचे खापर आधीच्या मनसेच्या सत्ताकाळावर फोडून स्वत:चे हसे करून घेत आहे, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशीयांनी सांगितले. दरवर्षी पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असतो. फक्त एका महिन्यात सुमारे ९ हजार ४६२ खड्डे बुजविल्याचा दावा करून भाजपने आपल्याचभ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केले आहे, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.मनसेने या ९ हजार ४६२ खड्ड्यांचे पालकत्व सिद्ध करण्याचे आव्हान देखील भाजपला दिले आहे. भाजपने खोटे दावे करून जनतेची दिशाभूल करू नये अन्यथा मनसेच्या वतीने याबाबत तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असे त्यांनीसांगितले.खड्डयांवरून सेनेचाही टोलाभाजपने खड्यांवरून दिलेल्या प्रत्युत्तरावरून शिवसेनेने देखील टीकास्त्र सोडले आहे. भाजपाने मनसे आणि शिवसेनेच्या काळात उपमहापौर आणि अन्य पदे भूषविली होती. भाजपने सर्वांसोबत सत्तासुख घेवून आता मात्र नामनिराळे होण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचे विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी म्हंटले आहे. खडड्डे पडल्याने रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खडड्यांच्या मलिद्यात भाजपही वाटेकारी आहे काय असाप्रश्न बोरस्ते यांनी केला आहे.

 

 

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMNSमनसे