शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील कुरघोडींमुळे भाजपा तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:57 IST

शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातील इच्छुकांनी कुरघोडीची रणनीती चालविल्याचे पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिकची जागा भाजपाकडे ओढून घेण्याकरीता हालचाली सुरू झाल्याचे समजते.

ठळक मुद्देठाकरेंचा इशारा : अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसण्याची भीती

नाशिक : शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातील इच्छुकांनी कुरघोडीची रणनीती चालविल्याचे पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिकची जागा भाजपाकडे ओढून घेण्याकरीता हालचाली सुरू झाल्याचे समजते.लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती झाल्याने निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेकडून प्रत्येक मतदारसंघात एकाहून अधिक इच्छुक तयार झाले असून, अशा इच्छुकांच्या अंतर्गत गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडणे केल्यास भाजपाला जागा सोडू, असा इशारा दिल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी दावेदारी करणाऱ्यांना धडकी भरली आहे. मुळातच नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संख्याबळ अधिक असल्याने भाजपाही सदर जागा पदरात पाडून घेण्यास उत्सुक आहे.शिवसेनेकडून विद्यमान खासदारासह चौघांनी दावेदारीकेली असून, प्रत्येकाने उमेदवारी मिळविण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी चालविली आहे. अशा परिस्थितीत सामान्य सैनिक मात्र संभ्रमित झाला असून दुसरीकडे प्रत्येक इच्छुकाचा स्वतंत्र गट तयार होवून एकमेकांच्या विरोधात कागाळ्या सुरू झाल्या आहेत. पक्षांतर्गत सुरू असलेल्या या भांडणाचा लाभ विरोधी पक्षाला होण्याची भीती आहे. तसेहीनाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करता भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघात वर्चस्व असून, शहरात त्यांचे तीन आमदारआहेत तसेच ६६ नगरसेवक सध्या कार्यरत असून, भाजपाने याच बळावर नाशिक लोकसभेच्या जागेवर ते दावा चालविल्याच समजते. यापूर्वी डॉ. दौलतरावअहेर हे भाजपाच्या तिकिटावर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्याचाही आधार यासाठी घेतला जात आहे. त्यामुळे शिवसेनेत उमेदवारीसाठी चालविलेल्या एकमेकांवरील कुरघोडीचा लाभ उचलण्यास भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत.अन्य पर्यायांचा शोधनाशिकप्रमाणे राज्यात अन्य ठिकाणीही असेच प्रकार सुरू झाल्याच्या तक्रारी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी इच्छुकांना दम भरतांनाच थेट जागाच भाजपाला सोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांना घाम फुटला असून, ठाकरे यांच्याकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावण्यासाठी अन्य पर्यायांचा शोध सुरू झाला आहे.चंदना

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपा