शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना आमदाराने गायलं देवेंद्र सरकारचं गुणगान!

By श्याम बागुल | Updated: November 3, 2018 16:21 IST

आमदार अनिल कदम यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून महसुलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीष महाजन यांना पाचारण करण्यात आले होते.

ठळक मुद्देअनिल कदम : युतीची चर्चा की, पक्षांतराची वाट ?

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथे आमदारांच्या विकास निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष सेना आमदार अनिल कदम यांनी भाजपाच्या मंत्र्यांचे गुणगान गायल्यामुळे राज्यात सेना-भाजपा एकत्र येण्याची चर्चा होत असताना काहींनी यात अनिल कदम हे येत्या निवडणुकीत भाजपाचे कमळ हाती धरणार असल्याची चर्चा सुरू केली आहे.

आमदार अनिल कदम यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून महसुलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीष महाजन यांना पाचारण करण्यात आले होते. प्रास्ताविक करताना अनिल कदम यांनी जायकवाडीच्या पाणी प्रश्नाचा उल्लेख करून पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मराठवाडा आणि नाशिक या दोन जिल्ह्यात योग्य तो समतोल साधत मार्ग काढल्याबददल कौतुक केले तर महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या साऱ्या अपेक्षा पुर्ण केल्याचे सांगून एक प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न पाटील यांनी मिटविल्याचे प्रशस्तीपत्र देऊन टाकले. कदम यांनी महाजन व पाटील यांच्यावर स्तुतीसुमने वाहिल्यामुळे ते भाजपाच्या जवळ गेल्याचा अर्थ राजकीय वर्तुळात काढला जात असून, हे करीत असताना कदम यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे बसलेले असल्याचेही भान राहिलेले नाही.

उद्धव-चंद्रकांत पाटील एकाच गाडीतून...

शिवसेनेच्या मुखपत्रात दररोज राज्य सरकारचे वाभाडे काढले जात असताना कदम यांनी भाजपाच्या मंत्र्यांविषयी काढलेल्या गौरवोद्गारामुळे उपस्थित शिवसैनिकांनाही आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे ओझर विमानतळावरून उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील या दोघांचेही एकाच वाहनातून सभास्थळी आगमन झाले व या दोघांचेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन यांनी स्वागत केल्यामुळे तर सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात त्यापेक्षाही भाजप-सेनेच्या युतीचीच चर्चा अधिक झडली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा