शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:38 IST

पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक व आमदारांमध्ये स्थानिक पातळीवर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेतील मरगळ व नाराजी दूर करण्यासाठी मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला

नाशिक : पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक व आमदारांमध्ये स्थानिक पातळीवर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेतील मरगळ व नाराजी दूर करण्यासाठी मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून, महापालिकेचे सभागृह नेत्यापाठोपाठ आता शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाकडून या संदर्भातील नवीन अध्यक्षाची घोषणा केली जाण्याची खात्रीशीर वृत्त आहे.भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्षपदी आमदार बाळासाहेब सानप असून, महापालिका निवडणुकीपासूनच त्यांच्याविरुद्ध पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. उमेदवारी वाटप करताना सानप यांनी स्वपक्षातील अन्य आमदार व पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांचे तिकिटे कापल्याचे शल्य अजूनही अनेकांच्या मनात असून, त्याचबरोबर महापालिकेची पदे वाटप करतानाही सानप यांनी आपल्याला सोयीस्कर असलेल्या नगरसेवकांचीच वर्णी लावली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे सानप यांच्याविरुद्ध थेट जाहीरपणे आजवर नाराजी बोलून दाखविण्यात आलेली नसली तरी, अलीकडे महाजन यांच्यापासून सानप काहीसे दूर गेल्याची संधी साधून त्यांच्या विरोधकांनी डोके वर काढून ज्याप्रमाणे पक्षाला डोईजड ठरू पाहणारे महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यासाठी व्यूहरचना केली. त्याचप्रमाणे आता ‘सानप हटाव’ मोहीम सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात पक्षाच्या काही पदाधिकाºयांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्याबाबत तक्रारीही केल्याचे वृत्त आहे. सानप यांच्याविषयी पक्षात वाढत जाणारी नाराजी विधानसभा निवडणुकीत पक्षाला परवडणारी नसून, तत्पूर्वी त्यावर इलाज करण्याचा भाग म्हणून एकटे सानपच नव्हे तर अन्य काही पदाधिकारी बदलण्याचा गांभीर्याने विचार पक्षात सुरू झाला आहे. भाजपा शहराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असून, प्रत्येकाने आपल्यापरीने पक्ष श्रेष्ठींकडे फिल्ंिडग लावली आहे. दुसरीकडे सानप यांनीही पद शाबित ठेवण्यासाठी आपले राजकीय वजन वापरले आहे.संघटनमंत्र्यांकडून चाचपणीभाजपा शहराध्यक्ष बदलाबाबत पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महिला आघाडीच्या राज्यस्तरीय बैठकीच्या निमित्ताने संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी काही पदाधिकाºयांशी चर्चा केली असून, रविवारी भाजपाचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व आघाडीच्या प्रमुखांची या निमित्ताने बैठक बोलाविण्याचीही चर्चा होऊ लागली आहे. या बैठकीत नवीन शहराध्यक्षांचे नाव निश्चित केले जाईल व तशी शिफारस प्रदेशस्तराव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक