भाजप, मनसे नेत्यांकडून आगामी निवडणुकीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST2021-07-18T04:11:42+5:302021-07-18T04:11:42+5:30

राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष संघटना बांधणी व शहरापुढील प्रश्न समजावून ...

BJP, MNS leaders prepare for the upcoming elections | भाजप, मनसे नेत्यांकडून आगामी निवडणुकीची तयारी

भाजप, मनसे नेत्यांकडून आगामी निवडणुकीची तयारी

राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष संघटना बांधणी व शहरापुढील प्रश्न समजावून घेतले. त्यानंतर काही शिष्टमंडळांनी ठाकरे यांची भेट घेतली. तर पुत्र अमित ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्ते, आघाडी प्रमुखांशी पक्षाच्या ‘राजगड’ कार्यालयात बैठक घेऊन महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काही इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. परंतु राज ठाकरे यांना भेटीसाठी सकाळपासून कार्यकर्त्यांनी गर्दी केली; मात्र ते निवडक पदाधिकाऱ्यांनाच भेटल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

चौकट====

आणि भेट झालीच नाही

राज ठाकरे व चंद्रकांत पाटील हे दोघेही एकाच वेळी नाशकात अवतरल्याने त्यांची भेट होऊन त्यातून काही राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात होती. स्वत: पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्या सोबत नाशकात चहा घ्यायला आवडेल, असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात अशी भेट झालीच नाही.

Web Title: BJP, MNS leaders prepare for the upcoming elections