भाजपला भारी, पण शिवसेना घेईल का यंदा उभारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:44+5:302021-08-13T04:18:44+5:30

नाशिक महापालिकेत पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून २०१२ पर्यंत शिवसेना भाजप यांच्यात युती होती. १९९२ मध्ये भाजपचे १०, तर शिवसेनेचे ९ ...

BJP is heavy, but will Shiv Sena take over this year? | भाजपला भारी, पण शिवसेना घेईल का यंदा उभारी?

भाजपला भारी, पण शिवसेना घेईल का यंदा उभारी?

नाशिक महापालिकेत पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून २०१२ पर्यंत शिवसेना भाजप यांच्यात युती होती. १९९२ मध्ये भाजपचे १०, तर शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले होेते. नंतर मात्र, त्यात भाजपाची पीछेहाट होत गेली. २००७ मध्ये शिवसेनेचे २१ नगरसेवक, तर भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले. शिवसेना-भाजप युतीची सत्ता असल्याने शिवसेनेने अधिक आक्रमकता दाखविली. त्यावेळी शिवसेनेत बऱ्यापैकी एकसंधता होती. २००२ मध्ये पुन्हा शिवसेनेचे ३८, तर भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले. २००७ मध्ये शिवसेनेचे संख्याबळ घटले आणि २६ नगरसेवक, तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले. २०१२ मध्ये म्हणजे शिवसेना आणि भाजप स्वतंत्ररीतीने लढल्यानंतर त्यावेळी मनसेच्या लाटेचा दोन्ही पक्षांना फटका बसला आणि शिवसेनेचे १९, तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले. दोघांची युती झाली असती तरी ते मनसेच्या एकूण संख्याबळाच्या म्हणजे ४० नगरसेवक होत नव्हते. त्यातच भाजपने मनसेला साथ दिली. त्यामुळे सेना भाजपचे नाशिकमध्येच नव्हे, तर वरिष्ठ पातळीवरही संबंध ताणले गेले हेाते. २०१२ मध्ये पहिल्या अडीच वर्षांत मनसे-भाजप युती असली तरी नंतर मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात युती झाल्याने पुन्हा महापालिकेत युती झाली; परंतु त्याचा उपयोग महापौरपद गाठण्यात झाला नाही.

२०१७ मध्ये राज्यात भाजप हाच मोठा भाऊ होता आणि शिवसेनाही सत्तेत असली तरी भाजपने बाजी मारली. सुरुवातीला नाशिकमध्ये राजकीय वातावरण वेगळे होते. ६० ते ६५ नगरसेवक शिवसेनेचे आणि भाजपचे ३० ते ३५ नगरसेवक येतील असे सांगितले जात हेाते. मात्र, नंतर भाजपने डाव फिरवला. निवडणुकीसाठी लागणारी भरपूर रसद उमेदवारांपर्यंत पोहोचवली, त्याचा आणि एकूणच देशात तसेच राज्यात असलेल्या भाजपच्या लाटेचा फायदाही त्या पक्षाला झाला.

आता राज्यात सत्ता, पुन्हा महाविकास आघाडी असे समीकरण असले आणि भाजप विरोधी पक्षात असला तरी सेनेच्या दृष्टीने भाजप हेच मोठे आव्हान आहे. त्यातच भाजपत वाढलेली बेदीली, फाटाफूट बऱ्यापैकी पथ्यावर पडू शकेल असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

इन्फो..

गेल्या निवडणुकीत केवळ भाजपने जादा बळ वापरले किंवा तत्सम कितीही घडमोडी असल्या तरी सेनेतील वाद विवादांचादेखील फटका बसला. उमेदवारी देण्यावरून थेट हॉटेलात नेत्यांनाच बदडून काढले. भाजपात उघड वाद दिसत होते. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यावेळी त्यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे सूत्रे होती, त्यावेळी पक्षात नवे जुने वाद खदखद होते; मात्र तरीही भाजपने बाजी मारली. सेनेत मात्र अंतर्गत वाद कायम राहिले.

इन्फाे...

शिवसेनेची महापालिकेतील वाटचाल

१९९२- ९

१९९७- २१

२००२- ३८

२००७- २६

२०१२- १९

२०१७- ३५

Web Title: BJP is heavy, but will Shiv Sena take over this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.