शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे मानसिक आजारी आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशकात ठाकरे यांना टोला

By संकेत शुक्ला | Updated: May 18, 2024 16:39 IST

नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

संकेत शुक्ल, नाशिक :उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले आहेत. त्यामुळे ते काहीही बडबड करीत आहेत. अन्यथा भगव्या ध्वजाबाबत त्यांनी असे उद्गार काढले नसते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला. नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, चोरांचे सरदार कोण आहेत हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. 

राज्यासह मुंबई मनपा लुटण्याचा प्रकार ठाकरे यांनी केल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळे विकास झाला. मात्र, ठाकरे यांना तो दिसत नाही. उद्धव यांनी हिंदुत्व सोडले नसते, काँग्रेस सोबत गेले नसते तर ते फस्ट्रेट झाले नसते. भगव्या ध्वजाबाबत त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या पराभूत मानसिकतेचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले. ठाकरे आडनावाला वलय आहे. परंतु राज ठाकरे यांना बाहेर काढण्यात आले. उद्धव यांनीच त्यांना बाजूला केले. राज ठाकरे यांनी भाजपला समर्थन देण्याचा निर्णय योग्य आहे. पंतप्रधान मोदी राज यांच्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील, असा आम्हाला विश्वास आहे. शरद पवार यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पवारांचा पक्ष बारामतीतही हरतो आहे. त्यामुळे त्यांना उतारवयात गल्लोगल्ली फिरावे लागते आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

टॅग्स :NashikनाशिकChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरे