शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

भाजपचा उमेदवार आज निश्चित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:44 AM

नाशिक : महापौरपदाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आल्याने भाजपमध्ये धावपळ सुरू असून, उमेदवार घोषित केल्याशिवाय गणिते जमविणे कठीण असल्याने ...

नाशिक : महापौरपदाचीनिवडणूक अवघ्या चार दिवसांवर आल्याने भाजपमध्ये धावपळ सुरू असून, उमेदवार घोषित केल्याशिवाय गणिते जमविणे कठीण असल्याने पक्षाने तशी तयारी सुरू केली आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्ट संघटनमंत्री किशोर काळकर हे मंगळवारी (दि.१९) कोकणात सहलीवर असलेल्या नगरसेवकांची मते अजमावणार असून, त्याचवेळी उमेदवार घोषित करणार असल्याची माहिती गटनेता जगदीश पाटील यांनी दिली. दरम्यान, भाजपच्या संपर्काबाहेर सात-आठ नव्हे तर अनेक नगरसेवक होते. त्यातील तीन जण भाजपच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. तर आठ जणांचा संपर्क नसला तरी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पक्षाचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे अन्य पक्षांशी बोलणी करण्याची जबाबदारी भाजपच्या आमदारांंना देण्यात आली आहे.भाजपच्या उमेदवारीसाठी सध्या पक्षात प्रचंड स्पर्धा असून, त्यामुळे पक्षाला उमेदवार ठरविणे जिकिरीचे झाले आहे. पक्षातील मूळ नगरसेवकांना देण्याची मागणीदेखील पुढे रेटली जात असून, अशावेळी पक्षातील ज्येष्ठत्व की निवडणूक आणि सभागृह संचलन करण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षातील इच्छुकांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे भेटी-गाठी घेणे सुरूच ठेवले असून, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर तसेच अरुण पवार यांनी मुंबईत गाठीभेटी घेतल्याचे वृत्त आहे.तर दिनकर पाटील यांनी विरोधी पक्षांतील अनेकांशी संधान जुळवून व्यूहरचना सुरू केली आहे. पक्षात अनेक इच्छुक नगरसेवक सेवक असून, त्यात शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके, सतीशनाना कुलकर्णी, संभाजी मोरूस्कर, जगदीश पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक असून, उपमहापौरपदासाठीदेखील कमलेश बोडके, गणेश गिते, संगीता गायकवाड, प्रा. शरद मोरे, प्रियांका घाटे असे अनेक जण इच्छुक आहेत. त्यात माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांची सर्वाधिक बळकट दावेदारी मानली जात आहे.प्रभागात चार नगरसेवक निवडून आणतानाच पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत सीमा हिरे यांच्या यशात मोलाचा वाटा त्यांचा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तयार असलेल्या पाटील यांना पक्षाच्या नेत्यांनी थांबवून महापौरपदाचा शब्द दिल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याचबरोबर महापालिकेत बहुमत असतानाही फाटाफुटीच्या शक्यतेमुळे त्यांच्यावरून शक्यतेमुळे परिस्थिती हाताळण्यासाठीदेखील पक्षाला सक्षम उमेदवाराची गरज आहे त्यामुळेच पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. मंगळवारी (दि.१९) माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर हे सिंधुदुर्गमध्ये सहलीवर असलेल्या नगरसेवकांची भेट घेऊन त्यांची मते अजमावणार आहेत. त्यानंतर पक्षाचे उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचे गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले.दरम्यान, भाजपचे मच्छिंद्र सानप, पूनम सोनवणे, प्रियांका माने, पूनम धनगर, सुमन सातभाई, विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, सुनीता पिंगळे हे गटनेत्यांच्या संपर्काबाहेर आहेत. त्यातील काहीजण मोबाइल उचलत नाही, असे गटनेते पाटील यांनी सांगितल्यामुळे संबंधितांशी प्रत्यक्ष भेटून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजपच्या गोटात आता ५१ नगरसेवकपक्षाच्या सहलीत नसलेले आणि अन्यत्र असलेले भगवान दोंदे, राकेश दोंदे, पुंडलिक खोडे हे सोमवारी (दि.१८) पक्ष नेत्यांशी चर्चा करून कॅम्पमध्ये रवाना झाले. आता पक्षाच्या सहलीच्या ठिकाणी एकूण ५१ नगरसेवक भाजपच्या कॅम्पमध्ये आहेत.भाजपचे नगरसेवक कोकणातील देवगढमध्ये असून, हा नीतेश राणे यांचा मतदारसंघ आहे. नगरसेवकांत फाटाफूट होऊ नये यासाठी संबंधितांना खास राणे यांच्या मतदारसंघात ठेवण्यात आले आहे. सोमवारी (दि. १८) या नगरसेवकांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी देवदर्शन केले. या नगरसेवकांना आता गोव्याला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकBJPभाजपा