शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे फरांदे, हिरे यांना उमेदवारी; सानप अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:07 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शहरातील तिघा आमदारांपैकी आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी मंगळवारी (दि.१) देण्यात आली असून, त्यामुळे या मतदारसंघातील अन्य प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापण्यात आल्याने त्यांच्यावर टांगती तलवार आहे.

ठळक मुद्देधक्कातंत्र : अनेक इच्छुक बंडखोरीच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शहरातील तिघा आमदारांपैकी आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी मंगळवारी (दि.१) देण्यात आली असून, त्यामुळे या मतदारसंघातील अन्य प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापण्यात आल्याने त्यांच्यावर टांगती तलवार आहे.नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत, तर ग्रामीण भागात एक आमदार आहे. सर्वच मतदारसंघात भाजपकडूनच मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार असल्याने या मतदारसंघांबाबत उत्कंठा होती. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या वतीने माजी आमदारासह अन्य अनेक जण इच्छुक होते, तर नाशिक पश्चिममध्ये अशीच अवस्था होती. या मतदारसंघात गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले होते. बहुतांशी प्रबळ दावेदारांनी तर आमदारांशी संघर्ष सुरू केला होता. त्यामुळे भाजपत तर गटबाजी वाढली होती. त्यातून आरोप- प्रत्यारोपदेखील झडत होते.सर्वाधिक प्रबळ दावेदारी नाशिक पूर्व मतदारसंघात असून, तेथील अनेकजण लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार बाळासाहेब सानप यांच्या विरोधात वातावरण पेटले आहे. सानप यांना उमेदवारी देऊ नये यासाठी अन्य इच्छुकांनी सोमवारी (दि.३०) मेळावा घेतला. इतकेच नव्हे तर त्यानंतर मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही गट ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भातील अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सादर करू आणि तेच याबाबत निर्णय घेतील, असे जाहीर केले. मंगळवारी (दि.१) पक्षाच्या वतीने भाजपच्या वतीने १२५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात नाशिक पूर्वमधून कोणालाही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा