शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा शहराध्यक्षपदी पालवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:41 IST

शहराध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही नूतन चेहेऱ्याच्या शोधासाठी तब्बल नऊ महिने वेळ घेतल्यानंतर अखेरीच अध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. १९) त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

नाशिक : शहराध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही नूतन चेहेऱ्याच्या शोधासाठी तब्बल नऊ महिने वेळ घेतल्यानंतर अखेरीच अध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. १९) त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.पालवे हे भाजपाचे जुने कार्यकर्ते असून, त्यांनी २००७ मध्ये युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर २०११ मध्ये युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितले आहे. त्यानंतर सध्याचे मावळते शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीत ते उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांना प्रथमच शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मंगळवारी (दि.२०) मावळते अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याकडून ते सूत्र स्वीकारतील. विधानसभेच्या तोंडावर भाजपाने शहराध्यक्षपदाचा शोध सुरू केला होता.मावळते अध्यक्ष बाळासाहेब सानप यांना पदमुक्त करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. त्यांची मुदत गेल्यावर्षी संपलीच होती. त्यानंतर भाजपाने आमदार आणि शहराध्यक्ष अशा प्रकारची दुहेरी जबाबदारी एकाच व्यक्तीकडे न देण्याचा निर्णय घेतला तरी मध्यंतरी लोकसभा निवडणुकांमुळे हा विषय टळला. त्यानंतर अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यात माजी अध्यक्ष विजय साने, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, सुनील केदार, उत्तमराव उगले, अनिल भालेराव, पवन भगूरकर, प्रशांत जाधव, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश कांबळे अशा अनेकांची नावे चर्चेत असले तरी नवा चेहराच देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता.अनेक इच्छुक नाराजभाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी अनेक दावेदार होते. त्यापैकी अनेक जण नव्या दमाचे परंतु पालवे यांच्यापेक्षा जास्त काळ भाजपात काम करणारे अनेक निष्ठावान होते. मात्र प्रस्थापितांच्या गटातून आणि आर्थिक सुबत्तेच्या निकषावर हा निर्णय झाला अशा प्रकारच्या भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक