बरखास्तीच्या भीतीने सर्वपक्षीयांची एकजूटजिल्हा बॅँकेत भाजपा-सेना साथ साथ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:43 IST2017-12-24T00:41:12+5:302017-12-24T00:43:48+5:30
नाशिक : विविध चौकश्या व गैरव्यवहारांच्या तक्रारीवरून बरखास्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत केदा अहेर यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांची साथ साथ वाटचाल सुरू झाली आहे. अध्यक्षपद भाजपाकडे व उपाध्यक्षपद सेनेकडे असल्यामुळे नजीकच्या काळात दोन्ही पक्षाच्या ताब्यात बॅँक राहणार असल्याने बॅँकेवर सहकार विभागाकडून केल्या जाणाºया संभाव्य कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसे असले तरी, केदा अहेर यांची बिनविरोध निवड करून सर्वपक्षीय संचालकांनी बॅँकेचे भवितव्य लक्षात घेता एकजूट दाखविण्याचे औदार्य दाखविले आहे.

बरखास्तीच्या भीतीने सर्वपक्षीयांची एकजूटजिल्हा बॅँकेत भाजपा-सेना साथ साथ !
नाशिक : विविध चौकश्या व गैरव्यवहारांच्या तक्रारीवरून बरखास्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत केदा अहेर यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांची साथ साथ वाटचाल सुरू झाली आहे. अध्यक्षपद भाजपाकडे व उपाध्यक्षपद सेनेकडे असल्यामुळे नजीकच्या काळात दोन्ही पक्षाच्या ताब्यात बॅँक राहणार असल्याने बॅँकेवर सहकार विभागाकडून केल्या जाणाºया संभाव्य कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसे असले तरी, केदा अहेर यांची बिनविरोध निवड करून सर्वपक्षीय संचालकांनी बॅँकेचे भवितव्य लक्षात घेता एकजूट दाखविण्याचे औदार्य दाखविले
आहे.
जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी भाजपाने सुरुवातीपासूनच दावेदारी करण्यास सुरुवात केली असली तरी, त्याला बळ देण्याचे काम मूळ राष्टÑवादीचे परवेज कोकणी यांनी केले. त्र्यंबक नगरपालिका निवडणुकीपासून भाजपाशी त्यांची वाढलेली जवळिकता जिल्हा बॅँकेत भाजपाला उभारी देणारे होते, अशातच त्र्यंबक नगरपालिका भाजपाच्या ताब्यात आल्यामुळे तर भाजपानेही कोकणी यांना पदरात घेतले होते. खुद्द मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या पुढ्यात कोकणी यांचे प्रदर्शन करण्यात आमदार बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेतला, अर्थात हे करत असताना सानप यांनी कोकणी यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून पक्षांतर्गत विरोधकांना धक्का देण्याचे साधून घेतले. त्यामुळे जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपदी कोकणी यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. त्यांच्या पाठीशी जवळपास दहा ते बारा संचालकांचे बळदेखील होते, या बळात कॉँग्रेस व राष्टÑवादी समर्थक संचालकांचा समावेश होता. परंतु नेहमीच राजकारण करणाºयांना कोकणी यांची अध्यक्षपदी निवड होणे मानवणारे नव्हते, त्यामुळेच की काय अल्पसंख्याक व बहुसंख्याक असा वाद उभा करण्यात आला, त्याला जातीय जोड देण्याचाही प्रयत्न इच्छुकांनी करून पाहिला, परिणामी बहुसंख्याकांच्या नाराजीने जिल्हा बॅँकेची सत्ता भोगण्यास भाजपाला परवडली नसती. त्यामुळे एकमताने उमेदवाराचा पर्याय पुढे आला व केदा अहेर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात कोकणी यांचा मनाचा मोठेपणा अधिक आहे. केदा अहेर यांच्यामुळे मूळ भाजपावासीयांच्या ताब्यात पहिल्यांदा जिल्हा बॅँकेची सूत्रे गेली आहेत. उपाध्यक्षपद सेनेकडे ठेवण्यात येणार असल्यामुळे सेनेने या बिनविरोध निवडणुकीस हातभार लावला आहे, त्यामुळे आगामी काळात भाजपा-सेनेची बॅँकेत वाटचाल कायम असेल. त्याला विरोधी पक्षाच्या संचालकांचा निश्चितच पाठिंबा राहील.