शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
2
बिहार निवडणुकीतील घात कोणी केला? आरजेडीने चौकशी सुरू केली; कठोर कारवाई करण्याची तयारी
3
नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...
4
वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो
5
"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
6
मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा
7
राक्षस नवरा! मधुचंद्राच्या रात्री नवरीने 'ती' मागणी नाकारली; संतापलेल्या नवरदेवाने हातोडा घेऊन केले जीवघेणे वार
8
बाबा वेंगाचे भाकित: २०२६ मध्ये भूकंप, ज्वालामुखी, प्रलयाने हादरणार जग; पृथ्वीचा एक भाग होणार बेचिराख
9
'माझ्यामुळेच जिंकलो असं कुणी समजू नये', अमित शाहांनी भाजप नेत्यांचे टोचले कान
10
'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश
11
White House Shooting: गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता प्रत्येक विदेशी नागरिकाला..."
12
'अमर' नव्हे 'अकरम'! हिंदू नाव सांगून मैत्री, नोकरीचे आमिष अन्...; नराधमाला १० वर्षांचा कठोर कारावास
13
Video - 'आयफोन' वाला लंच बॉक्स घेऊन शाळेत गेला मुलगा; शिक्षिकाही झाली हैराण
14
अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी
15
ज्यांचे बँक खाते किंवा UPI ID नाही त्यांनाही ऑनलाईन पेमेंट करता येणार! भीम ॲपचे नवीन फीचर' लाँच
16
गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'
17
आता कोणताही ग्रॅज्युएट बनू शकतो इनव्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर आणि रिसर्च अ‍ॅनालिस्ट, सेबीनं नियमांत केले बदल
18
निवासी इमारती पत्त्याच्या पानांसारख्या जळाल्या, ४४ जणांचा मृत्यू, ३ जणांना अटक
19
क्रूझ कंट्रोलसह लॉन्च झाली Hero Xtreme 160R 4V, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
20
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कडवाच्या पाण्याने दोन जलकुंभ भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:29 IST

सिन्नर : कडवा धरणातून राबविण्यात आलेल्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले असून, या पाण्याने गुरुवारी सायंकाळी उद्योगभवन व शिवाजीनगर येथील दोन जलकुंभ भरण्यात आले. या दोन जलकुंभातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचे वितरण सुरू केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे यांनी दिली.

ठळक मुद्देआजपासून वितरण : महिनाभरात सिन्नरसह उपनगरांना पाणी वितरणाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कडवा धरणातून राबविण्यात आलेल्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले असून, या पाण्याने गुरुवारी सायंकाळी उद्योगभवन व शिवाजीनगर येथील दोन जलकुंभ भरण्यात आले. या दोन जलकुंभातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचे वितरण सुरू केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे यांनी दिली.गेल्या दोन महिन्यांपासून कडवा धरणातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणि जलशुद्धीकरणापासून ते शहरातील या दोन जलकुंभांपर्यंत पाणी आणण्याची चाचणी सुरू होती. कोनांबे येथील जलकुंभातून शुद्धीकरण झालेले पाणी गुरुवारी सायंकाळी शिवाजीनगर व उद्योगभवन या जलकुंभात दाखल झाले. जलशुद्धीकरण केंद्रापासून गॅ्रव्हिटीने हे पाणी या जलकुंभांमध्ये आले. शिवाजीनगर येथील पावणेसहा लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ आणि उद्योगभवन येथील साडेबारा लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ या पाण्याने भरण्यात आल्याचे डगळे यांनी सांगितले.या दोन जलकुंभातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचे वितरण करण्यास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजीनगर येथील जलकुंभ भरण्यास अगोदर ९ तास लागत होते. आता साडेतीन तासात सदर जलकुंभ भरण्यात येतो. तर उद्योगभवन येथील जलकुंभ भरण्यास अगोदर १४ तास लागत होते आता हा जलकुंभ ५ ते ६ तासात भरला जाणार आहे. त्यामुळे या दोन जलकुंभातून ज्या भागांना पाणी जाते अशा भागात दिवसाआड पाणी देण्याचा विचार असल्याचे डगळे यांनी सांगितले.शिवाजीनगर, उद्योगभवन या दोन जलकुंभातून व्यवस्थित वितरण सुरू झाल्यानंतर येत्या आठ दिवसांत बीपीटी आणि गोंदेश्वर या भागातील जलकुंभात पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचेही नियोजन जमल्यानंतर शहर व उर्वरित भागाला महिनाभरात सुव्यवस्थित वितरण करण्याचे नियोजन असल्याचे डगळे, लोखंडे व वाजे यांनी सांगितले. महिनाभरात पूर्ण क्षमतेने कडवा पाणीयोजना सुरू होऊन सिन्नरकरांना दररोज किंवा दिवसाआड पाणी मिळेल असा आशावाद डगळे यांनी व्यक्त केला.यावेळी नगरसेवक पंकज मोरे, सोमनाथ पावसे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, विजय जाधव, शैलेश नाईक, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, श्रीकांत जाधव, बाळासाहेब उगले, रुपेश मुठे, सुजाता तेलंग, सुजाता भगत, मंगला शिंदे, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, किरण खाडे यांच्यासह नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सिन्नर येथील शिवाजीनगर भागातील जलकुंभात कडवा पाणीयोजनेचे पाणी आल्यानंतर पाणीवितरणची माहिती देताना नगराध्यक्ष किरण डगळे. समवेत उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, हेमंत वाजे, व्यंकटेश दूर्वास, प्रमोद चोथवे, विजय जाधव, शैलेश नाईक, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, श्रीकांत जाधव, बाळासाहेब उगले, रुपेश मुठे, सुजाता तेलंग, सुजाता भगत, मंगला शिंदे, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, किरण खाडे आदी. अडचणींमुळेच पाणीयोजना सुरू होण्यास विलंबशेतातून जलवाहिनी टाकू देण्यास काही शेतकऱ्यांनी केलेला विरोध, तांत्रिक अडचणी, पेट्रोल पाइपलाइन क्रॉसिंग, वनविभागाची परवानगी, पाणीगळती, जलशुद्धीकरण केंद्रात वीज आणणे, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे येणाºया अडचणी यामुळे पाणीयोजना सुरू होण्यास विलंब झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिनाभरात शहरासह सर्व उपनगरात कडवा पाणीयोजनेच्या पाण्याचे वितरण सुरू होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी