शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

सिव्हिलसह बिटकोत ऑक्सिजन टँक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:09 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयात २० हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्यात येणार असून, त्यासाठीची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. तर बिटको रुग्णालयातही २० हजार किलोलीटर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून, त्याचे औपचारिक उद्घाटन करून तो येत्या वर्षात नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ठळक मुद्देमध्यवर्ती वितरण यंत्रणेद्वारे रुग्णालयाला ऑक्सिजनपुरवठा केला जाणार

नाशिक : जिल्हा रुग्णालयात २० हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्यात येणार असून, त्यासाठीची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. तर बिटको रुग्णालयातही २० हजार किलोलीटर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून, त्याचे औपचारिक उद्घाटन करून तो येत्या वर्षात नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या दोन्ही प्लांटमधून मध्यवर्ती वितरण यंत्रणेद्वारे रुग्णालयाला ऑक्सिजनपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयातील व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त खाटांची ऑक्सिजनची गरज भागणार असून, जम्बो ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यासाठी होणारा खर्च वाचणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जिल्हा रुग्णालयात ५२ व्हेंटिलेटरयुक्त खाटांचे दोन आयसीयू विभाग कार्यान्वित करण्यात आले. त्यात ४० व्हेंटिलेटर कोरोनाबाधितांसाठी तर अन्य रुग्णांसाठी १२ व्हेंटिलेटरची सज्जता ठेवण्यात आली असून, अन्य खाटांची संख्याही वाढविण्यात आली. त्यासाठी एका खासगी ऑक्सिजन उत्पादक कंपनीकडून जम्बो सिलिंडर खरेदी केले. शहरात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तीव्रता वाढली होती, तेव्हा जिल्ह्यातील रुग्णालयांच्या आयसीयूला शंभरहून अधिक ऑक्सिजन सिलिंडरची दररोज गरज भासत होती. मात्र, ऑक्सिजन साठवण टँक आणि मध्यवर्ती वितरण यंत्रणा बसविल्यास सिलिंडर विकत घेण्यासाठी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच ऑक्सिजनपुरवठ्यात सातत्य आणि प्रेशरमध्येही सकारात्मक वाढ होऊ शकणार आहे. रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन टँक बसवून मध्यवर्ती वितरण यंत्रणेद्वारे रुग्णालयातील खाटांना ऑक्सिजनपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या आवारात जागा निश्चित करून वर्कऑर्डरदेखील काढण्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन-चार महिन्यांत जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचे काम पूर्ण होऊन जिल्हा रुग्णालय ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकणार आहे.बिटकोत उभारला २० हजार किलोलीटर क्षमतेचा टँककोरोना काळात सिव्हिल आणि बिटको रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. अन्य ऑक्सिजनयुक्त खाटांसाठीही ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. ऑक्सिजनच्या टंचाईच्या काळात रुग्णालयाला जादा दराने ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करावे लागले होते. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, रुग्णसंख्येतही झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचा वापरही नियंत्रणात आला आहे. मात्र, भविष्यात कधीही ऑक्सिजनची गरज भासल्यास तुटवडा पडू नये या पार्श्वभूमीवर बिटकोमध्ये २० हजार किलोलीटर क्षमतेच्या टँकची उभारणी करण्यात आली असून, तांत्रिक अडचणींमुळे त्याच्या उद्घाटनाला विलंब झाला आहे. पुढील वर्षापासून नाशिक शहरासह जिल्ह्याला कधीही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य