एकदंत स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 22:41 IST2020-01-05T22:41:00+5:302020-01-05T22:41:26+5:30
औंदाणे : येथील एकदंत इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन नूतन सभापती इंदूबाई ढुमशे यांनी ...

औंदाणे येथील एकदंत इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी इंदूबाई ढुमसे, कान्हू अहिरे, माजी सभापती विमल सोनवणे, टी. के. धोंगडे, एम. एस. भामरे, रामदास धोंडगे, भामरे, देवा पवार आदींसह विद्यार्थी.
औंदाणे : येथील एकदंत इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन नूतन सभापती इंदूबाई ढुमशे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती कान्हू आहिरे, माजी सभापती विमल सोनवणे, गटशिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख एम. एस. भामरे, रामदास धोंडगे, मांगू सोनवणे आदी होते. येथील स्पर्धेत मुंजवाड व तळवाडे दिगर केंद्राचे स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल -
लहान गट : वक्तृत्व स्पर्धा वैभवी गुंजाळ (तिळवण), चित्रकला स्पर्धा- जागृती आहिरे (तळवाडे दिगर), २०० मी. धावणे मुले- संदीप निकम (तळवाडे दिगर), १०० मीटर धावणे मुली- अश्विनी माळी (पिंपळदर), वैयक्तिक नृत्य- अनुष्का सूर्यवंशी, (मुंजवाड), वैयक्तिक गायन- दिव्या चव्हाण (पिंपळदर), समूहनृत्य पिंपळदर मोठा गट - वक्तृत्व स्पर्धा- (पिंपळदर), चित्रकला स्पर्धा, जिगरपुरी (किकवारी), ४०० मीटर धावणे- मुले विजय वाघ (पिंपळदर), २०० मीटर धावणे मुली- नेहा सोनवणे (किकवारी), वैयक्तिक नृत्य- ज्योती तळवाडे (पिंपळदर), वैयक्तिक गायन- रोशनी सोनवणे (पिंपळदर),
समूहनृत्य (पिंपळदर), कबड्डी मुले- (पिंपळदर), कबड्डी मुली
(पिंपळदर), खोखो मुली (किकवारी) या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात
आली.
यावेळी यशवंत कापडणीस, आबा पवार, मुरलीधर पवार, किरण खैरनार, पोपट सोनवणे, बापू देवरे, राजू निर्भवणे, शिवराज पाटील,
संजय पवार आदी शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन देवा पवार यांनी, तर आभार एम. एस. भामरे यांनी मानले.