इसमाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:09 IST2020-03-03T17:08:51+5:302020-03-03T17:09:06+5:30
मालेगाव : किरकोळ वादातुन अतहर हुसेन अहमद हुसेन (५४) रा. हिरापन्ना कॉलनी यांच्यावर चाकूने वार करुन जीवे ठार मारणाºया इम्रान अहमद अनीस अहमद अन्सारी (२४) रा. सलीमनगर याला अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्याय. अनिरुद्ध गांधी यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

इसमाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप
मालेगाव : किरकोळ वादातुन अतहर हुसेन अहमद हुसेन (५४) रा. हिरापन्ना कॉलनी यांच्यावर चाकूने वार करुन जीवे ठार मारणाºया इम्रान अहमद अनीस अहमद अन्सारी (२४) रा. सलीमनगर याला अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्याय. अनिरुद्ध गांधी यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ५ जून २०१७ रोजी हुडको कॉलनीत हा प्रकार घडला होता.
अतहर हुसेन अहमद हुसेन हा नमाज पठण करुन घरी जात असताना इम्रान अहमद याने त्याची छेड काढली होती. छेड का काढली याचा जाब अतहर याने इम्रानला विचारला असता त्याचा त्याला राग आला. त्याने चाकूने गंभीर वार करुन जखमी केले होते. जखमी अवस्थेत अतहर याला सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अजहर हुसेन अहमद हुसेन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. इम्रान विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा खून खटला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्यात दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अॅड. अशोक पगारे यांनी कामकाज पाहिले.