शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाची पार्टी मागीतली म्हणून नाशकात दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:25 IST

वाढदिवसाला बोलावले नाही अथवा पार्टी दिली नाही म्हणून रुसवे फुगवे होण्याचा अनुभव आपल्याचील प्रत्येकालाच नेहमी येतो. परंतु वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे त्याच्या वाढदिवसाची पाटी मागीतल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्याला चक्क मारहान केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नशिकमधील गंगापूर भागातील शिजीनगर परिसरात मंगळवारी (दि.१२) हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केले आहे. 

ठळक मुद्देवाढदिवसाची पार्टी मागितले म्हणून मारहाणओळखीच्या व्यक्तींमध्येच मारहाणीचा प्रसंगाने नागरिकांमध्ये आश्चर्यगंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; दोघांना अटक

नाशिक : वाढदिवसाला बोलावले नाही अथवा पार्टी दिली नाही म्हणून रुसवे फुगवे होण्याचा अनुभव आपल्याचील प्रत्येकालाच नेहमी येतो. परंतु वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे त्याच्या वाढदिवसाची पाटी मागीतल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्याला चक्क मारहान केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नशिकमधील गंगापूर भागातील शिजीनगर परिसरात मंगळवारी (दि.१२) हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथील अतुल बापूराव निकम (२४) व साक्षिदार गणेश सुधाकर क्षिरसागर (२०)  शिवाजी नगरच्या भवर टॉवरसमोर उभे असताना तेथे  संशयित आरोपी शिवाजी नगर येथील सौरभ अशोक यादव (२२)  व सातपूकच्या अशोकनगर येथील सुभम अनिल कुमावत (२३) आले. यातील सौरभ यादवचा वाढदिवस असल्याने अतुल व गणेश यांनी सौरभकडे वाढदिवसाची पार्टी मागीतली. त्याकारणाने राग येऊन संशयीत आरोपीने  शूभमच्या संगन्मताने कुरापत काढून अतूल व गणेश  यांना शिविराळ केली. याचदरम्यान सौरभने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने  अतुलच्या छातीवर डोक्यावर मारून  त्याला दुखापत केली. तर शूभम याने   गणेश याला लाकडी दांड्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर सौरभ यादव यानेही अतूल व गणेश यांच्याविरोधात अशीच फिर्याद नोंदवली आहे. अतूल व गणेश यांनी वाढदिवसाची पार्टी मागीतली असता आपल्याकडे पैसे नससल्याचा सांगितल्याने त्याचा राग येऊन दोघांनीही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक टी. पी. पाळदे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी जिवे ठार मारण्याची धमकी व प्रयत्न तसेच शस्त्रबंधी आदेशाचे उल्लंघन  करण्याच्या प्रकरणात सौरभ  याजव  व शूभम कुमावत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक  टी. पी. पाळदे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक