वाढदिवसानिमित्त डास प्रतिबंधक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:45+5:302021-09-24T04:17:45+5:30
नाशिक : अंबड परिसरात डासांची उत्पत्ती वाढल्याने चिकुन गुन्या, डेंग्यूची साथ सुरू आहे. मात्र, मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत ...

वाढदिवसानिमित्त डास प्रतिबंधक फवारणी
नाशिक : अंबड परिसरात डासांची उत्पत्ती वाढल्याने चिकुन गुन्या, डेंग्यूची साथ सुरू आहे. मात्र, मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेचे कैलास चुंभळे यांनी वाढदिवसानिमित्त प्रभागात डास प्रतिबंधक फवारणी केली. शिवसेनेच्या सिडको विभागातर्फे कैलास सोनवणे यांनी हा उपक्रम हाती घेतला. कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना आता डेंग्यू, चिकुन गुन्याने डोके वर काढले आहे. मात्र, याकडे मनपा आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याने चुंभळे यांनी वाढदिवसानिमित्त डास प्रतिबंधक फवारणी केली. यावेळी जयराम गवळी, राधेय मालपाणी, रमेश उघडे, सचिन कुलकर्णी, अनु शहा, विजय चुंबळे, बंडू शिंपी, रमेश घुले, बाळासाहेब चुंबळे, मनोज चव्हाणके, बंटी निकम, भूषण राणे, विशांत चुंभळे, प्रतीक चुंभळे, किरण करडील, योगेश चुंभळे, विष्णू वारुंगसे, संदीप वाजे उपस्थित होते.
----- फोटो : आर ला : २३ फवारणी ------