महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती
By Admin | Updated: October 3, 2014 00:52 IST2014-10-03T00:51:22+5:302014-10-03T00:52:08+5:30
महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती

महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती
सिन्नर : शहर तालुक्यातील विविध संस्थांच्या विद्यालयांमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती संयुक्त पद्धतीने उत्साहात पार पडली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यात ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
नवजीवन डे स्कूल : येथील श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूलमध्ये गांधी व शास्री जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान आवाहनास प्रतिसाद देत शाळा व परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रारंभी गांधी व शास्री यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांची नेत्यांच्या जीवन प्रवासावर भाषणे झाली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर परिसराच्या स्वच्छता करण्यात आली. मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.