बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात
By Admin | Updated: January 23, 2016 23:42 IST2016-01-23T23:41:34+5:302016-01-23T23:42:32+5:30
विविध कार्यक्रम : सामाजिक संस्था, संघटनांतर्फे अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात
नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहर परिसरातील शिवसेना शाखा व सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेवा युवक मित्रमंडळाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगे महाराज चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ताजी गायकवाड, जयंत दिंडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, नगरसेविका कल्पनाताई पांडे, चंद्रकांत पांडे, संदीप कानडे, कुंदन दळे, बाळासाहेब कोकणे, अरुण नेवासकर, महेश बिडवे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी लाडूंचे वाटप, आधारतीर्थ आधाराश्रम, त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शालेय कपडे व ब्लँकेट वाटप करण्यात आले.
रविवार कारंजा
प्रभाग क्रमांक १३ रविवार कारंजा येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उपमहानगर प्रमुख अॅड. नीलेश कुलकर्णी, विभाग प्रमुख श्याम कंगले, उपविभाग प्रमुख सचिन धोंडगे, पप्पू टिळे, दीपक कपिले, शामला दीक्षित आदि उपस्थित होते.
संदर्भ सेवा रुग्णालय
शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सप्ताह निमित्ताने जयंती महोत्सव व लाडू वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे सर्जन व्ही. एस. कुलकर्णी, प्रमोद नांथेकर, दादाजी अहेर, बाळासाहेब उगले, विशाल घागस, शशांक देशमुख, अंकुश राऊत, शोभाताई दोंदे, शोभाताई दिवे, शुभांगी देशमुख, कमलाकर नागपुरे आदि उपस्थित होते.
सावरकर चौकात स्वाक्षरी मोहीम
शिवसेना प्रणित इंदिरानगर युवक मित्रमंडळाच्या वतीने स्वा. वि. दा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी सावरकर चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे पाचशे स्वाक्षऱ्या जमा करण्यात आल्या होत्या. यावेळी शिवसेना मध्य विधानसभा प्रमुख संजय गायकर, सुनील खोडे यांसह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.