पक्षीनिरीक्षणासाठी ‘बर्ड फेस्टिव्हल’ची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:18 AM2018-01-10T00:18:50+5:302018-01-10T00:19:43+5:30

नांदूरमधमेश्वर : वन्यजीव विभागाचा प्रयत्न; तीन दिवसीय संमेलननाशिक : देशी-विदेशी स्थलांतरित पाणथळ जागेवरील पक्ष्यांचे नंदनवन म्हणून राज्य नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीनदिवसीय पक्षी संमेलनाची पर्वणी पक्षीप्रेमींना साधता येणार आहे.

'Bird Festival' for bird watching | पक्षीनिरीक्षणासाठी ‘बर्ड फेस्टिव्हल’ची पर्वणी

पक्षीनिरीक्षणासाठी ‘बर्ड फेस्टिव्हल’ची पर्वणी

Next
ठळक मुद्दे विविध पक्ष्यांची जैवविविधता दरवर्षी हिवाळ्यातवन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार

नांदूरमधमेश्वर : वन्यजीव विभागाचा प्रयत्न; तीन दिवसीय संमेलननाशिक : देशी-विदेशी स्थलांतरित पाणथळ जागेवरील पक्ष्यांचे नंदनवन म्हणून राज्य नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीनदिवसीय पक्षी संमेलनाची पर्वणी पक्षीप्रेमींना साधता येणार आहे.
नाशिकपासून तीस किलोमीटरवर चापडगाव पक्षीनिरीक्षण केंद्र नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिध्द आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणामुळे येथे विविध पक्ष्यांची जैवविविधता दरवर्षी हिवाळ्यात पहावयास मिळते. यावर्षी प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅण्डिंगसाठी नाशिक वन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना पक्ष्यांची जैवविविधता लक्षात यावी, जेणेकरून निसर्गाचा दागिना असलेल्या पक्ष्यांविषयी आवड निर्माण होईल, या उद्देशाने प्रथम पक्षी संमेलन आयोजित करत असल्याची माहिती वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलनप्रमुख सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे उपस्थित होते. १९ जानेवारीपासून संमेलनाला प्रारंभ होणार आहे. वनविभागाच्या मुख्य अधिकाºयांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटनाचा सोहळा संपन्न होणार आहे. तीन दिवस चालणाºया या संमेलनासाठी परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नियमित दराने नाशिक (सायखेडामार्गे) चापडगाव थेट बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संमेलनासाठी वन्यजीव विभागाकडून (६६६.ु्र१ािी२३्र५ं’.ल्लं२ँ्र‘६्र’’्रिाी.ूङ्मे ) हे सविस्तर माहितीचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. संमेलनासाठी नियमितपणे वाहनतळ व प्रवेश शुल्कात
कोणतीही सूट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.असे असेल संमेलन... सकाळ-संध्याकाळ अभ्यासकांसमवेत पक्षीनिरीक्षण शिवार फेरी. सकाळी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याविषयी माहितीपर व्याख्यान. दुपारच्या सत्रात पक्षी छायाचित्रण, निरीक्षणाविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन. अभयारण्यात टिपलेल्या विविध छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली चित्रकला स्पर्धा.

Web Title: 'Bird Festival' for bird watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.