जानेवारीत रंगणार ‘बर्ड फेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:34 IST2017-12-24T00:31:38+5:302017-12-24T00:34:40+5:30

नाशिक : येथील वनविभागाच्या (वन्यजीव) वतीने नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ आयोजित केला आहे. या दरम्यान, पक्षीप्रेमींना पक्षी अभ्यासकांमार्फत पक्ष्यांची जैवविविधता जाणून घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'Bird Fest' to be played in January | जानेवारीत रंगणार ‘बर्ड फेस्ट’

जानेवारीत रंगणार ‘बर्ड फेस्ट’

ठळक मुद्देतीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषद

नाशिक : येथील वनविभागाच्या (वन्यजीव) वतीने नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ आयोजित केला आहे. या दरम्यान, पक्षीप्रेमींना पक्षी अभ्यासकांमार्फत पक्ष्यांची जैवविविधता जाणून घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्णातील निफाड तालुक्यातील चापडगाव येथे वन्यजीव विभागाच्या वतीने पक्षी निरीक्षण गॅलरी, मनोरे उभारले आहेत. नांदूरमधमेश्वर बंधाºयाच्या पाणथळ जागेच्या परिसरात हे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे या अभयारण्याला नांदूरमधमेश्वर असे नाव पडले. या अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यामध्ये देशी-विदेशी पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सायबेरीया, युरोप, आफ्रिका अशा विविध देशांमधून स्थलांतरित पक्षी येथे हजेरी लावतात. सध्या हजारो पक्षी येथील पाणथळ जागेवर पाहुणचार घेत भूक भागवित आहेत.
२या पक्ष्यांची माहिती व्हावी, त्यांची जैवविविधता, नागरिकांना जाणून घेता यावी, यासाठी वन्यजीव वनविभागाच्या वतीने प्रथमच बर्ड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बर्ड फेस्टची वेळ पहाटे सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात पक्षी अभ्यासकांसमवेत अभयारण्यात पक्षीनिरीक्षण शिवार फेरी दुपारच्या सत्रात चर्चासत्र व संध्याकाळच्या सत्रात पुन्हा शिवार फेरी असा क्रम राहणार असल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले. छायाचित्र प्रदर्शन
फेस्टिव्हलदरम्यान तीनदिवसीय ‘नांदूरमधमेश्वर छायाचित्र प्रदर्शन’ भरविले जाणार असून, या प्रदर्शनासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने सर्वच हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांना आवाहन करण्यात आले आहे. चांगल्या दर्जाचे नांदूरमधमेश्वर या अभयारण्याच्या परिसरात टिपलेले विविध पक्ष्यांचे छायाचित्र वन्यजीव वनसंरक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाठवावे, निवडक छायाचित्रांना प्रदर्शनामध्ये स्थान दिले जाईल तसेच विजेते छायाचित्रही निवडून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे प्रवीण यावेळी म्हणाले. सदर प्रदर्शन चापडगाव परिसरापासून दोन किलोमीटरवर खानगावथडी गावात वन्यजीव विभागाने उभारलेल्या निसर्ग निर्वाचन केंद्रात भरविले जाणार आहे.

Web Title: 'Bird Fest' to be played in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.